व्हॉल्वो या जगप्रसिद्ध ऑटोमोबाइल कंपनीही आता भारतासाठी इलेक्ट्रिक कार तयार करत आहे. व्हॉल्वोची ही पहिली इलेक्ट्रिक कार एकदा चार्ज केली की तब्बल ४०० किमी धावू शकणार आहे. भारतात इलेक्ट्रिक गाड्यांना आता पसंती मिळू लागली आहे. वाहन उत्पादक नव्याने तयार होऊ लागलेल्या या ग्राहकवर्गावर लक्ष ठेवून आहेत. लक्झरी कार उत्पादक व्होल्वोही आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. व्होल्वोने भारतासाठी व्होल्वो एक्ससी ४० या इलेक्ट्रिक कारवर काम करायला सुरूवात केली आहे.
ही कार कॉम्पॅक्ट मॉड्यूलर आर्किटेक्चर म्हणजेच सीएमए प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. ज्यात ऑल-व्हील ड्राइव्हसह ४०२ बीएचपीची पॉवर दिली जाईल. एका सिंगल चार्ज वर ४०० किमीपेक्षा जास्त ड्राईव्हिंग रेंज देण्याची क्षमता असेल. कार नेमकी कधी बाजारात येईल याची खात्रीलायक माहिती नाही. मात्र, व्होल्वोची पहिली इलेक्ट्रिक कार एक्ससी ४० पुढील वर्षी बाजारात येईल. व्होल्वो एक्ससी ४० चार्जिंगबद्दल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फास्ट-चार्जर सिस्टम वापरल्यास या कारची बॅटरी फक्त ४० मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.
भारतात व्हॉल्वो एक्ससी ४० रिचार्जची किंमत ५० ते ६० लाखांदरम्यान असण्याची शक्यताय. मात्र, नेमकी किंमत लॉन्चिंगच्या आधी जाहीर होईल. सध्या लक्झरी इलेक्ट्रिक सेगमेंटला टक्कर देताना मर्सिडीज बेंझने आपली ईक्यूसी बाजारात आणली असून त्याची किंमत १ कोटी आहे.