मुक्तपीठ टीम
कार प्रेमींसाठी एक भन्नाट ऑफर आहे. व्हॉल्वोच्या गाड्यांचा समावेश भारतात लक्झरी सेगमेंटमध्ये आहे. बजेट जास्त असल्यामुळे त्यांना एका मर्यादित प्रतिसादच लाभतो. पण आता तेवढं बजेट नाही म्हणून हिरमुसलं होऊ नका. आता व्हॉल्वो इंडियाने आपल्या कारचे मॉडेल सबस्क्रिप्शन योजनेतून बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांना वर्षभर व्हॉल्वोची कार वापरता येईल. त्यानंतर त्यांनी त्या गाडीचे भाडे द्यायचे आहे.
व्हॉल्वोची ही ऑफर सध्या केवळ दिल्ली आणि हरियाणामध्ये सुरू आहे. एस ९० वगळता इतर सर्व मॉडेल्सवर लागू असलेली ही ऑफर लवकरच इतरत्रही उपलब्ध होणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे, व्हॉल्वो देशातील इतर भागातही या ऑफरची सुरूवात करणार आहे. तसेच, कंपनीने वर्गणीदार दराचे तपशील जाहीर केले नाहीत. या योजनेअंतर्गत, व्हॉल्वो कारची निवड करणारे ग्राहक कमीतकमी १२ महिन्यांच्या कालावधीसाठी सबस्क्रिप्शनवर कार वापरू शकतात. या घोषणेसह, व्हॉल्वोने देखील याची खात्री केली आहे की, वाहन देखभाल किंवा विमा, नोंदणी आणि रस्ता कर देखील सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये समाविष्ट केला जाईल.
व्हॉल्वो कंपनीच्या कार सबस्क्रिप्शनविषयी माहिती
१. सबस्क्रिप्शन मॉडेलची निवड करणाऱ्या ग्राहकांना कार निर्मात्याकडून जुन्या आणि नवीन कारपैकी एक निवडण्याचा पर्याय देण्यात येईल.
२. व्हॉल्वो कार चालविण्यासाठी ग्राहकांना एडव्हान्स पैसे देण्याची गरज नाही.
३. सबस्क्रिप्शन कालावधी संपल्यानंतर ग्राहकाकडून सबस्क्रिप्शन फी आकारली जाईल.
सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये असणारे व्हॉल्वोचे मोडल्स
१. सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये एक्ससी ४०, एक्ससी ६० आणि एक्ससी ९० सारख्या मॉडेल्सचा समावेश असेल.
२. या तिन्ही एसयूव्ही, ग्राहकांना नवीन आणि पूर्णपणे मालकी म्हणून देण्यात येतील.
३. या तीन एसयूव्ही व्यतिरिक्त, व्होल्वो सबस्क्रिप्शन घेण्यासाठी ड्राईव्ह मॉडेलचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या एस ६० सेडान देखील देईल.
४. तसेच, जुन्या मॉडेलवर पर्याय उपलब्ध नसल्याने ग्राहकांना केवळ नवीन एस ६० सेडान चालविण्याची संधी मिळेल.