मुक्तपीठ टीम
जर्मन वाहन निर्माता कंपनी फॉक्सवॅगनने अधिकृतरित्या आपल्या बहुप्रतिक्षित एसयूव्ही टायगुन या कार नेमकी कशी असणार ते उघड केले आहे. या कारला सर्वात पहिल्यांदा फेब्रुवारी २०२० मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आले होते. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायटन कंपनीची ही २.० स्ट्रेटेजीच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आलेली पहिली मेड इन इंडिया कार असेल. जी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस लॉन्च केली जाऊ शकते. परंतु,कंपनीने या कारची लॉन्चिंग डेट बद्दल कोणतीही खात्री दिली नाही.
टायगुन हे नाव कंपनीने नॉर्थ अमेरिकेतील टायगा फॉरेस्ट या नावावरून ठेवले आहे.एसयूव्हीमध्ये कंपनीच्या नवीन एलिमेंट्स डिझाइन्स देण्यात आल्या आहेत ज्या टी-रॉकशी जुळतात. डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या फ्रंटमध्ये एक व्हीडब्ल्यू स्ल्टेड ग्रिल आहे जे स्लिक-लुक दिसणाऱ्या एलईडी हेडलाइट्स आणि एलईडी डीआरएलद्वारा फ्लॅक केल्या आहेत.फॉग लॅम्प केसिंगवर क्रोम केसिंग देण्यात आली आहे. सोबतच यामध्ये १७ इंचाचे ड्युअल टोन एलॉय व्हील मिळतात.रियरच्या दोन्ही बाजूस एलईडी टेल लाइट्स बूटच्या लांबीवर चालणार्या एलईडी पट्टीशी जोडलेली आहेत. यात क्रोम डोअर हँडल्स, सिल्व्हर रूफ रूल्स आणि ब्लॅक-बी-पिलर आहेत.
टायगुन ही कंपनीची पहिली मेड इन इंडिया कार आहे जी एमक्यूबी एओइन प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. इंजिन म्हणून टायगुनला १.० लिटरचे ३ सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि १.५ लिटरचे ५ सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते.लहान टीएसआय इंजिन ११५ पीएस पॉवर आणि १७५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.१.५ -लीटर टीएसआय युनिट १५० पीएस पॉवर आणि २५० एनएमची पीक टॉर्क जनरेट करते.ट्रान्समिशनमधे ६-स्पीड टॉर्क कनव्हर्टरला ऑटोमॅटिक आणि १.५ लिटर इंजिनला पर्यायी ७-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.
कंपनी यावर्षी उत्सवाच्या हंगामापूर्वी या कारचे लॉन्चिंग करू शकते, जी भारतीय बाजारात आल्यानंतर ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टो सोबतच स्कोडा कौशक बरोबर स्पर्धा करेल. मीडिया रिपोर्टनुसार, त्याची किंमत सुमारे ११० लाख निश्चित केली जाऊ शकते. फोक्सवैगन टायगुनच्या बिल्ड क्वालिटी कंपनीची लोकप्रियता ही पोलो आणि व्हेंटोपेक्षा मजबूत आहे.असेही मानले जाते की त्यामध्ये ४x४ पर्यायासाठी कंपनीची कोणतीही योजना नाही.