मुक्तपीठ टीम
भारतीय बाजारात फॉक्सवॅगन टायगुन ही काँम्पॅक्ट एसयूव्ही लवकरच लॉन्च होणार आहे. फॉक्सवॅगन इंडियाने आपल्या नव्या येणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयुव्हीचे उत्पादनन सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. पुण्यातील स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाच्या चाकण प्लांटमधून ही नवीन टायगुन रोल आऊट करण्यात आली आहे. फॉक्सवॅगनने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे. अनेक नवीन फिचर्ससह ही कार लवकरच लॉन्च होणार आहे.
भारतीय बाजारात होणार लवकरच उपलब्ध.
- भारतात उत्पादन सुरु.
- सप्टेंबर २०२१ मध्ये २०२१ फॉक्सवॅगन टायगुन भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता.
- MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर बनवली जाणारी ही या जर्मन कंपनीची पहिली कार असणार आहे.
- पुण्यातील प्लांटमधुन या कारच्या प्रोडक्शनला सुरुवात.
- निर्मात्यांनी अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली हि माहिती.
- विविध आणि नवीन फिचर्स सह कार लवकरच होणार लॉन्च.
कारचे युनिक फिचर्स
- भारतीय बाजारात दोन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजनासह होणार लॉन्च.
- यामध्ये १ लिटर टीएसआय आणि १.५ लिटर टीएसआय समाविष्ट असेल.
- याचे १-लीटर टीएसआय इंजन ११३ bhp ची अधिकतम पॉवर आणि १७५ Nm ची पीक टॉर्ज जेनरेट करेल.
- याचे १.५ लीटर टीएसआय इंजन १४८ bhp ची अधिकतम पॉवर आणि २५० Nm ची पीक टॉर्ज जनरेट करेल.
- १ लीटर टीएसआय इंजन६ ची स्पीड मैनुअल ट्रांसमिशन पेक्षा कमी असेल.
- यामध्ये ६ स्पीड ऑटोमैटिक ट्रांसमिशन चा पर्याय देखील उपलब्ध असेल.
- ६ स्पीड ऑटोमैटिक ट्रांसमिशन सोबतच 7स्पीड डीएसजीचा पर्याय देखील उपलब्ध असेल.