मुक्तपीठ टीम
व्हिवो नवीन जनरेशनमधील आधुनिक आणि मोस्टयूजेबल स्मार्टफोन. आता व्हिवो आपल्या वाय सीरिजसाठी एक नवीन स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. ज्याचे नाव व्हिवो Y21G असे आहे. या महिन्याच्या अखेरीस हा हँडसेट भारतात डेब्यू होण्याची शक्यता आहे. Y21G हा मीडियाटेक एमटी६७६९ प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो आणि ४जीबी+६४जीबी कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असू शकतो.
हँडसेटमध्ये १३+२एमपी ड्युअल रियर कॅमेरे, अॅंड्रॉईड १२ समाविष्ट असेल आणि ५००० एमएएच बॅटरीसह हा सर्वात स्लिम स्मार्टफोन असल्याचे म्हटले जाते.
व्हिवो Y21G चे आधुनिक फिचर्स
- व्हिवो Y21G मध्ये ६.५१ इंचाचा एचडी+ डिस्प्ले असेल.
- पॅनेल एलसीडी प्रकारातील असणे अपेक्षित आहे आणि सेल्फी कॅमेरासाठी वॉटरड्रॉप नॉच आहे.
- फोन मीडियाटेक एमटी६७६९ प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेजसह सुसज्ज असू शकतो.
व्हिवो Y21G कॅमेरा फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
- फोटोग्राफीसाठी, व्हिवो Y21G एलईडी फ्लॅशसह जोडलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देईल.
- कॅमेरा सेटअपमध्ये १३ एमपी प्रायमरी कॅमेरा आणि २एमपी मॅक्रो कॅमेरा समाविष्ट असल्याचे म्हटले जाते.
- यूजर्सना ८ एमपीचे शूटर आणि ऑरा स्क्रीन लाइट फिचर मिळेल.
- आगामी स्मार्टफोनच्या कॅमेरा फिचरमध्ये एचडीआर, सुपर मॅक्रो आणि पर्सनलाइज्ड पोर्ट्रेट मोडचा समावेश आहे.
फोन ५ हजार एमएएच बॅटरी सेलमधून पॉवर घेईल. जो १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अहवालात दावा केला आहे की, Y21G हा ५ हजार एमएएच बॅटरीसह सर्वात स्लिम हँडसेट असेल, ज्याचे वजन १८२ ग्रॅम असेल आणि सुमारे ८ मिमी त्याची जाडी असेल. फोन अॅंड्रॉईड १२ आधारित फनटचओएस १२ आउट ऑफ द बॉक्सवर चालेल आणि बायोमेट्रिक्स आणि सुरक्षिततेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे. याव्यतिरिक्त, व्हिवो Y21G हा मिडनाईट ब्लू आणि डायमंड ग्लो या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येऊ शकतो.