Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विस्तारा एअरलाइन्स आणखी झेपावणार! कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारापर्यंत वाढवणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Vistara Airlines

मुक्तपीठ टीम

विस्तारा एअरलाइनने या वर्षाच्या अखेरीस आपली कर्मचारी संख्या वाढवण्याची योजना आखली आहे. विस्तारा एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ विनोद कन्नन म्हणाले की, “कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारापर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे. ते पुढे म्हणाले की, विमान कंपनीचा ताफा वाढवण्यावर आणि एकूण सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यावर भर आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, कंपनीत सध्या सुमारे चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत.”

 

कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याने विस्ताराचा प्रवासी वाढवण्याकडे कल

  • कोरोना महामारीच्या पहिल्या ते तिसऱ्या लाटेचा हवाई वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे.
  • दुसऱ्या लाटेत गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात हवाई वाहतुकीत काही प्रमाणात सुधारणा दिसली, परंतु तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा फटका बसला.
  • तसेच, एअरलाइन उद्योगात पुन्हा रहदारीच्या संख्येत सुधारणा होत आहे. सीईओ विनोद कन्नन यांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये मागणी परत आली आहे आणि लोकांनी पुन्हा प्रवास सुरू केला आहे.
  • ते म्हणाले की, मला वाटते की संसर्गाची प्रकरणे कमी होत राहिलीत तर, विमान प्रवाशांची संख्या आणखी वाढेल.

 

कन्नन म्हणाले की, “एअरलाइन एकाच वेळी अनेक स्तरांवर कार्यरत आहे आणि सध्या प्री-कोरोना कालावधीपेक्षा जास्त उड्डाणे चालवत आहे. आम्ही एका दिवसात सुमारे २२० ते २५० उड्डाणे चालवत आहोत. आता आपल्याला कसे पुढे जाता येईल हे पाहूया. त्यामुळे आम्हाला आमचा ताफा वाढवण्याची गरज आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन केलेल्या विस्ताराच्या ताफ्यात सध्या ५० विमाने आहेत, जी २०२३ च्या अखेरीस ७० पर्यंत नेण्याचे कंपनीचे ध्येय आहे. या वर्षाअखेरीस कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारा पर्यंत वाढवण्याची योजना आहे.”

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsIndiamuktpeethPassenger TransportTravel StaffVistara AirlinesVistara Airlines CEO Vinod Kannanचांगली बातमीप्रवासी कर्मचारीप्रवासी वाहतुकभारतमुक्तपीठविस्तारा एअरलाइन मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कन्ननविस्तारा एअरलाइन्स
Previous Post

शरीराने नसले धडधाकट, तरी हिंमत मोठी! भंडाऱ्याच्या शेतकऱ्याची कथा प्रेरणादायी!

Next Post

महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम, एक कोटी पंधरा लाख बालकांना डोस!

Next Post
Pulse Polio Campaign

महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम, एक कोटी पंधरा लाख बालकांना डोस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!