मुक्तपीठ टीम
दोन हजारापेक्षा जास्त मुंबईकरांना बनावट लस देऊन जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी सात गुन्हे दाखल केले आहेत. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बनावट लसीकरण शिबिरासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कांदिवलीतील बनावट लसीकरणात ८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. बनावट लसीकरणाप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांनी विशेष एसआयटी स्थापन केली आहे, असे नांगरे पाटील म्हणाले.
हिरानंदानी इस्टेट
- सर्वात पहिलं शिबिर हिरानंदानी येथे आयोजित केलं.
- सर्वांना कोविशील्ड लस देण्यात आली.
- संबधित लस घेतल्याचं प्रमाणपत्र हाती आल्यानंतर जागा, वेळ या वेगवेगळ्या असल्याने रहिवाशांना संशय आला.
- नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असं नांगरे पाटलांनी सांगितलं.
- हिरानंदानी इस्टेट सोसायटी प्रकरणामध्ये आतपर्यंत तब्बल १० जणांना अटक झाली आहे.
कांदिवली
- कांदिवलीतील बनावट लसीकरण प्रकरणात ८ जणांना अटक करण्यात आली.
- आतापर्यंत १२ लाख ४० हजार रोख जप्त केली असल्याची माहिती दिली.
ठाणे
- शिवम हॉस्पिटलमधून हे डोस गेल्याचे समोर आले.
- रुग्णालयाच्या डॉक्टरांवर अटकेची कारवाई केली आहे.
- याप्रकरणात २०० व्यक्तीचे जबाब नोंदवण्यात आले.
- या गुन्हातील ३९० पैकी ३१४ लोकांचे बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आले आहे.
- मुंबईसह ठाण्यातही या टोळीने लसीकरण केले असून त्याबाबत माहिती ठाणे पोलिसांना दिली असून गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे.
बोरीवली
- आदित्य कॉलेज, बोरीवली पश्चिम, मुंबई येथे एकुण २२५ जणांचे लसीकरण करण्यात आले.
- त्याबाबत आरोपित इसम नामे राजेश पांडे, संजय गुप्ता, महेंद्र सिंग व शिवम हॉस्पिटलचे एक महिला व दोन पुरूष कर्मचारी यांचे विरूध्द गु.नो. कं ८५० / २०२१ कलम १८८,४२०,१२० ( ब ) भादवि कलम ५२ आपत्ती व्यवस्थापन कायदा सह कलम १८ ( अ ), २४,२७,२८ ( अ ) औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
- मानसी शेअर्स अॅण्ड स्टॉक, शिंपोली, बोरीवली पश्चिम, मुंबई येथे एकुण ५१४ जणांना लसीकरण करण्यात आले.
- त्याबाबत आरोपित इसम नामे राजेश पांडे, संजय गुप्ता, महेंद्र सिंग व करीम व शिवम हॉस्पिटलचे एक महिला, दोन पुरूष कर्मचारी यांचे विरूद गु.नो.कं ८५५/२०२१ कलम १८८,४२० , १२० ( ब ) , ४६५,४६८, ४७१ भादवि सह कलम ४३,६६ ( क ) माहिती तत्रज्ञान अधिनियम सह कलम ५२ आपत्ती व्यवस्थापन कायदा सह कलम १८ (अ) २४, २७, २८ (अ) औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम अन्वये नोंद करण्यात आला.
भोईवाडा
- अंतर्गत पोद्दार एज्युकेशनर सेटर, परेल पोस्ट ऑफिस लेन, परेल, मुंबई येथे २०७ जणांना लसीकरण्यात आले.
- नमुद गुन्हयात महेंद्र सिंग, श्रीकांत माने, सिमा सिंग व इतर ३ इसमांबाबत गु.नो.कं ३६२/२०२१ , कलम २६८,२७०,२७४ , २७५ , २७६ , ४१ ९ , ४२० , ४६५,४६७ , ४६८ , ४७० , ४७१ , ३४ , १८८ भादवि सह कलम ४३,६६ ( क ) माहीती तत्रज्ञान अधिनियम सह कलम ३ साथीचे रोग अधिनियम अन्वये नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये श्रीकांत माने व सिमा सिंग यांना अटक करण्यात आलेले आहे .
वर्सोवा
- अंतर्गत टिप्स कंपनी अंधेरी पश्चिम , मुंबई येथे एका १५१ जणांचे लसीकरण करण्यात आले.
- त्याबाबत आरोपि इसम नामे संजय गुप्ता , राजेश पांडे यांचे विरोधात गु.नो.कं २५२/२०२१ , कलम १८८,२६८,२७०,२७४,२७६,४१ ९ , ४६७ , ४६८,४७१,३४ भा.द.वि सह कलम ४३,६६ ( क ) माहीती तत्रज्ञान अधिनियम सह कलम ३ साथीचे रोग अधिनियम अन्वये नोंद करण्या आलेला आहे .
खार
- अंतर्गत टिप्स कंपनी, खार, मुंबई येथे २०६ जणांचे लसीकरण करण्यात आले.
- त्याबाबत राजेश पांडे , संजय गुप्ता व इतर ४ साथीदार यांचे विरोधात गु.नो. कं ५१२/२०२१ , कलम ४२०,२६८,२७०,२७४,२७५,२७६,१८८,३४ भा.द.वि सह कलम ३ साथीचे रोग अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
बांगुर
- अंतर्गत बँक ऑफ बडोदा, बेंच लिंक रोड , मालाड पश्चिम , मुंबई येथे ४० जणांचे लसीकरण करण्यात आले.
- त्याबाबत मनीष त्रिपाठी , संजय गुप्ता , करीम व इतर २ इसम यांचे विरोधात गु.नो.कं ८७४ / २०२१ , कलम ३०८,४१ ९ , ४२० , २६८,२७०,२७५,१८८,३४ भादवि सह सह कलम ५२ आपत्ती व्यवस्थापन कायदा सह कलम १८ ( अ ) , २४,२७,२८ ( अ ) औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम नोंद करण्यात आलेला आहे .
या ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले
- कांदिवली,
- वर्सोवा,
- खार,
- बोरिवली,
- भोईवाडा,
- बोरिवली,
- बांगुरनगर
- समतानगर
- अंधेरी
बनावट लसीकरणातील आरोपी
- याप्रकरणातील दोन मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंग आणि मनिष त्रिपाठी या दोघांची बँकची खाती गोठवण्यात आली आहेत.
- तसेच डॉ. पठारिया, मिसेस पठारिया यांना अटक करण्यात आली आहे.
- राजेश पांडे हा कोकिला बेन रुग्णालयाला सेल्सचा अधिकारी आहे.
- मोहम्मद करीम अकबर अली या सर्व गुन्ह्यात आरोपी असून मध्यप्रदेशचा राहणारा आहे.
आम्ही आवाहन करतोय असे काही या रॅकेटमार्फत कुठे लसीकरण झालं असेल , काही शिबीर राबवले असतील त्याची माहिती आम्हाला द्या , नावं गुप्त ठेवली जातील.
या टोळीवर सदोष मनुष्यवधासह अन्य गुन्हे दाखल केले आहेत, असंही नांगरे पाटील यांनी सांगितलं.