Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसोन्माद! उपलब्ध लशी वाढदिवसाच्या मुहूर्तासाठी दाबून ठेवल्या?

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
vaccination

विश्वंभर चौधरी / व्हा अभिव्यक्त!

दरवेळी आता उन्मादाचा विक्रम झाला असं आपल्याला वाटतं, पण पुढचा उन्माद लगेच आपल्याला भानावर आणतो आणि हे सांगतो की उन्मादाचं शिखर अजून वर आहे. अजून अजून वर आहे. कळसाला पोहोचल्याशिवाय उन्मादाचा नीट कडेलोट होत नसतो, कारण शंभराव्या अपराधापर्यंत वाट पहात बसण्याची आपली मानसिकता.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचा लसोन्माद याच प्रकारातला. ज्या लशी उपलब्ध होत्या, त्या वाढदिवसाच्या मुहूर्तासाठी दाबून ठेवल्या होत्या का? असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. तसेच झाले असावं हे स्पष्ट आहे, कारण एकाच दिवसात लसींचं एवढं उत्पादन झालं, असं तर ठार वेडा माणूसही म्हणणार नाही!

 

आत्ममग्नता आजार आहे, विक्रम नाही! मोदींची आत्ममग्नता जितकी घातक त्यापेक्षा घातक आहे त्यांच्या उच्चशिक्षित पण नागरिक म्हणून निर्बुद्ध असलेल्या अनुयायांची मोदीमग्नता. यांनी मेंदू एवढा बाहेर काढून ठेवला आहे की मोदींनी आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असलेली लस देणं हेही त्यांच्या वाढदिवसासाठी राखीव ठेवलं आहे हे कळण्याइतकीही अक्कल त्यांच्यात शिल्लक राहिलेली नाही.

 

मोदी आपल्याला माणूस न समजता फक्त मतदार समजतात हे कळण्याइतकी तरी बुद्धी शाबूत ठेवायला हवी. मोदी आपल्याला माणूस समजले असते तर लस उपलब्ध झाली तशी पटापट दिली असती. ‘त्यांचा वाढदिवस’ ही पूर्व अट आपल्या आरोग्याला लावली नसती!

 

मोदीकाळाचा सगळ्यात मोठा तोटा असा की भारतात नागरिक तयार न होता फक्त मतदार तयार केला जात आहे. यातून लोकशाही कुठं पोहोचणार ते कळत नाही.

 

संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना विचार करायला कधीच शिकवलं जात नाही याचा पुरेपूर फायदा मोदी घेतात. कारण तसं नसतं आणि ते विचार करणारे असते तर (गांधी वगैरे सोडा, ते तुमचे शत्रूच!) पण “हीच मोहीम परमपूज्य हेडगेवार, महापरमपूज्य गोळवलकर गुरूजी किंवा गेलाबाजार वाजपेयींच्या जयंती, पुण्यतिथीला राबवता आली नसती का”? असा एक किमान प्रश्न त्यांना नक्की पडला असता.

 

काल जे जे लस मोहीमेचं कौतुक करत होते ते ते कदाचित हे मान्य करत होते की आम्हाला जगवतील तर मोदीच अन्यथा नागरिक म्हणून जगण्याची आमची धमक नाही. नागरिक म्हणून प्रश्न वगैरे तर सोडाच पण ‘लशीसाठी तुमच्या वाढदिवसाची वाट न पाहणं हा आमचा हक्क आहे’हे सांगण्याइतकाही पाठीचा कणा नसेल तर अवघड आहे.

 

पुन्हा लिहितो, आत्ममग्नता कौतुकास्पद नसते तर ती चिंताजनक असते. तो एक मानसिक आजार आहे. आणि मानसिक आजार वाढू न देता कमी करणं हे एक माणूस म्हणून आपल्या सगळ्यांचं मानवी कर्तव्य आहे.

 

ही आत्ममग्नता या देशाला पूर्णतः खड्ड्यात घालण्याआधी नागरिक म्हणून जागे व्हा. तुमच्याच पैशातून तुम्हाला दिलेली लस ‘मोफत’ म्हणून तुम्हाला भिकारी ठरवावं, स्वतःच्या वाढदिवसापर्यंत वेठीला धरून मग द्यावी हे अजिबात योग्य नाही. लस ही जीवनावश्यक गोष्ट आहे, मोदी तुम्हाला वाटत असलेली खिरापत नव्हे.

 

आणि माध्यमं या उन्मादाचा गौरव करत असतील तर तो त्यांचा धंदा आहे असं म्हणून त्यांना माफ करून टाका. तुमच्यातला नागरिक मात्र जिवंत ठेवा.

 

जगभरातल्या कोणत्याही पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षानं लशीशी एवढा मोठा राजकीय खेळ केलेला नाही आणि हा त्यांचा विवेक आहे, दुबळेपणा नाही.

 

Vishwambhar Choudhari

(विश्वंभर चौधरी हे महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, कार्यकर्ते आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरप्रकारांविरोधात ते अभ्यासपूर्वक व्यक्त होतात. आणि योग्य मार्गाने सतत लढत असतात.)

ट्विटर – @DrVishwam


Tags: BJPpm modi brithdayprime minister narendra modivaccinationvaccination recordVishwambhar Choudhariपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

देशात आता एका राज्यात सर्वपक्षीय सरकार! विरोधी बाकांवर एकही आमदार नाही!!

Next Post

राज्यात ३ हजार ४१३ नवे रुग्ण, तर ८ हजार ३२६ बरे होऊन घरी परतले!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ३ हजार ४१३ नवे रुग्ण, तर ८ हजार ३२६ बरे होऊन घरी परतले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!