मुक्तपीठ टीम
पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त आणि भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विश्व मराठी परिषदेने पंडितजींचे जन्मगाव कुरुंदवाड येथे हा महोत्सव आयोजित केला आहे. संगीत रसिकांनी या महोत्सवासाठी उपस्थित राहावे असे आग्रही आमंत्रण विश्व मराठी परिषदेने दिले आहे.
सर्व रसिक, श्रोते आणि संगीतप्रेमी यांना आग्रही निमंत्रण देतानाच या महोत्सवासाठी प्रवेश निःशुल्क असेल, असेही परिषदेने कळवले आहे. तसेच खास बाब अशी की, बाहेरगावच्या रसिकांसाठी निःशुल्क निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
संगीत महोत्सव कालावधी
७ व ८ मे २०२२ : शनिवार – रविवार
ठिकाण
शिक्षण प्रसारक मंडळाची सैनिकी पॅटर्न शाळा परिसर, कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर – ४१६१०६
सन्माननीय सहभाग
- उस्ताद उस्मान खाँ – विदुषी मंगलाताई जोशी – रेवा नातू – पं. संजय गरुड – दीपकजी काळे
- चारुदत्त आफळे – गौरी पाटील – सुखदा काणे – गिरीश कुलकर्णी – पं. विनोद डिग्रजकर
- सौ. आलापिनी जोशी – श्री. केदार केळकर – कु. अपूर्वा कुलकर्णी
( साथसंगत – श्री. किशोर कोरडे, श्री. संतोष घंटे, श्री. अण्णाबुवा बुगड, श्री. चैतन्य देशपांडे, श्री. कल्याण देशपांडे, श्री. सारंग सांभारे, श्री. जितेंद्र कुलकर्णी, श्री. लक्ष्मण पाटील, ऋतुराज हिंगे, सानिका फडके )
विशेष उपस्थिती : श्री. वसंतराव पलुस्कर ( पं. विष्णु दिगंबर यांचे नातू आणि पं. डी. व्ही. यांचे चिरंजीव )
आणि आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे – कार्याध्यक्ष – संस्कार भारती
विनित,
प्रा. क्षितिज पाटुकले,
अध्यक्ष, विश्व मराठी परिषद
श्री.अनिल कुलकर्णी,
संचालक, विश्व मराठीपरिषद
प्रा. शरद पराडकर,
चेअरमन, शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड
टीप : बाहेरगावच्या रसिकांसाठी निःशुल्क निवास व्यवस्था उपलब्ध आहे.
संपर्क- कुरुंदवाड – १) बाबासाहेब भुजुगडे – 9850544436 २) प्रमोद शिंदे – 9860991074
पुणे – १) स्वाती यादव – 9673998600 २) तुषार जाधव – 9309545687