मुक्तपीठ टीम
एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरवाढीमुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेसकडून तर सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. महागाईविरोधात कधी ट्वीट करत, कधी संसदेबाहेर घोषणाबाजी करत काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. आता तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची एका काँग्रेस नेत्यासोबत विमानात वाद झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एलपीजीच्या वाढत्या किमती आणि वाढती महागाई यावर काँग्रेसच्या पदाधिकारी महिलेने स्मृती इराणींना प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना स्मृती इराणी या थेट उत्तर देत नसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
नेता डिसोझा यांची स्मृती इराणी यांच्याशी बाचाबाची
- खरंतर, स्मृती इराणी आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेता डिसोझा दिल्ली-गुवाहाटी फ्लाईटने प्रवास करत होत्या.
- यावेळी डिसोझा यांनी स्मृती इराणींवर प्रश्नांचा वर्षाव केला.
- महागाईने जनता हैराण झाली आहे.
- त्यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ डिसोझा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
- या व्हिडिओसह डिसूझा यांनी लिहिले – स्मृती इराणीजी गुवाहाटी फ्लाइटमध्ये भेटल्या.
- एलपीजीच्या सतत वाढणाऱ्या किमतींवर त्यांची उत्तरे ऐका.
- महागाईचे खापर ते कोणत्या गोष्टींवर फोडत आहेत!
- जनता विचारे प्रश्न, स्मृती यांनी टाळले! व्हिडिओत जरूर पाहा, मोदी सरकारचे सत्य!
गुवाहाटी की फ़्लाइट में @smritiirani जी से सामना हुआ।
रसोई गैस की लगातार बढ़ती क़ीमतों पर सुनिए उनके जवाब 👇
महँगाई का ठीकरा,वे किन-किन चीज़ों पर फोड़ रहीं हैं !
जनता पूछे सवाल, स्मृति जी दें टाल !
वीडियो के अंशों में ज़रूर देखिये, मोदी सरकार की सच्चाई ! pic.twitter.com/fyV6ossGZm— Netta D’Souza (@dnetta) April 10, 2022
स्मृतींच्या आधी शुभेच्छा, मग वैतागून खोटेपणाचा आरोप!
- डिसूझा यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी त्यांच्या प्रश्नांना थेट उत्तर देत नसल्याचे दिसून येत आहे.
- काँग्रेस नेत्याशी झालेल्या संवादादरम्यान एका महिला प्रवाशाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना ‘हॅपी बिहू’च्या शुभेच्छा दिल्या.
- स्मृती यांनी त्या महिलेला प्रत्युत्तर दिले.
- यावर नेता डिसूझा म्हणाले की, विना गॅस, स्टोव्हशिवाय हॅपी बिहू.
- यावर स्मृती इराणी यांनी डिसूझांवर खोटी विधाने केल्याचा आरोप केला.
- खोटं बोलू नका, तुम्ही चुकीचे करत आहात, असे स्मृती म्हणाल्या.
महागाईचा भडक्यात वादाचा व्हिडीओ व्हायरल!
- स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितले की, त्या त्यांच्या परवानगीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे.
- यावर नेता डिसोझा म्हणाल्या की, तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या पदावर आहात.
- लोकांना तुमच्याकडून उत्तरे हवी आहेत.
- नेता आणि स्मृती इराणी यांच्यात सुरू असलेल्या संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- अलिकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलसोबतच एलपीजी सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
- इंधनाची महागाई भडकत असताना हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होणं स्वाभाविक मानलं जात आहे.