Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डिलाईल पूल बांधकाम व हिंदमाता भूमिगत पर्जन्य जल टाकीच्या कामांची आदित्य ठाकरेंकडून पाहणी

April 11, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Aditya Thackeray inspected Delai Road bridge And hindmata underground rain water tank

मुक्तपीठ टीम

लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळ रेल्वेकडून बांधण्यात येत असलेल्या डिलाईल रोड उड्डाणपुलाच्‍या बांधकामाची आणि तेथे महानगरपालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या पोहोच रस्‍त्‍यांच्या कामांची राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पाहणी केली. तसेच हिंदमाता परिसरातील पावसाचे पाणी साठविण्यासाठी सेंट झेवियर्स मैदानात बांधण्यात येत असलेल्या भूमिगत पर्जन्य जल टाकीच्या कामाची देखील त्यांनी पाहणी केली.

Aditya Thackeray inspected Delai Road bridge And hindmata underground rain water tank

लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळील डिलाईल पूल जीर्ण झाल्‍याने हा पूल रेल्‍वेने तोडला आहे. त्‍याचे ८५ मीटर लांबीचे बांधकाम रेल्वे करणार असून यासाठीचा निधी महापालिकेने दिला आहे. तर, एकूण ६०० मीटर लांबीच्या तीन पोहोच रस्‍त्‍यांचे बांधकाम महानगरपालिका करीत आहे. या कामांच्या प्रगतीची पाहणी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी आमदार सुनील शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी.वेलरासू, माजी मंत्री सचिन अहिर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Aditya Thackeray inspected Delai Road bridge And hindmata underground rain water tank

आदित्य ठाकरे म्हणाले, रेल्वेकडून हाती घेतलेल्या कामास गती देण्याच्या अनुषंगाने मी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. रेल्वे प्रशासनाचे काम पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेला पुढील काम हाती घेता येणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने हाती घेतलेल्या पोहोच रस्त्यांसाठी आतापर्यंत आवश्यक काम गतीने करण्यात आले आहे. रेल्वेने गर्डरचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर महानगरपालिकेचे उर्वरित काम देखील तातडीने पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Aditya Thackeray inspected Delai Road bridge And hindmata underground rain water tank

आदित्य ठाकरे यांनी हिंदमाता परिसरात साचणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी सेंट झेविअर्स मैदानात बांधण्यात येत असलेल्या भूमिगत जल धारण टाक्यांच्या कामाची पाहणी केली. हिंदमाता परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे अतिवृष्टीप्रसंगी तेथील सखल भागात पाणी साचते. या समस्येवर मात करण्यासाठी महानगरपालिकेने सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जल धारण टाकीचे बांधकाम हाती घेतले असून हे काम पूर्णत्वाकडे आहे. या टाक्यांमध्ये दोन कोटी ८७ लाख लीटर पाणी साठवता येणार आहे. त्यामुळे हिंदमाता परिसराला पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळेल.

प्रमोद महाजन उद्यानातही अशाच स्वरूपाची भूमिगत जल धारण टाकी बांधली जात आहे. पंपिंग स्टेशन व भूमिगत जलधारण टाकी यामुळे हिंदमाता परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होऊन वाहतूक सुरळीत राहण्यास यापुढे आणखी मदत होणार आहे. मिलन सबवे आणि इतर सखल भागांचाही अभ्यास करून अशाप्रकारची उपाययोजना करण्यात येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.


Tags: aditya thackerayDelai roadhindmataParelUndergrount water tankपालकमंत्री आदित्य ठाकरेहिंदमाता भूमिगत पर्जन्य जल टाकी
Previous Post

#मुक्तपीठ #Live फुले-आंबेडकर विचार प्रणाली…मानव मुक्तीचा जाहीरनामा! वक्ते – प्रा.डॉ. सतीश शिरसाठ

Next Post

स्वयंपाकाच्या गॅसवरून विमानात स्मृती इराणींशी कोणी घातला वाद?

Next Post
Smriti Irani

स्वयंपाकाच्या गॅसवरून विमानात स्मृती इराणींशी कोणी घातला वाद?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!