Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा स्थापन करा”: विनोद निकोले

August 15, 2021
in घडलं-बिघडलं
0
vinod nikole

मुक्तपीठ टीम

उद्घाटनाच्या आधी नवीन पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा स्थापन करा असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे ईमेल द्वारे पत्र पाठवून जोरदार मागणी केली आहे.

 

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, सागरी, डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ पासून नव्याने पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा अस्तित्वात आला. पालघर जिल्हयात आदिवासी लोकसंख्या मोठी आहे. वारली चित्रकला व तारपा नृत्‍य ही या जिल्हयाची सांस्कृतिक ओळख आहे. डहाणू तालुक्यातील घोलवडचे चिकू प्रसिध्द आहेत. जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली, कातकरी, मल्हार कोळी इत्यादी आदिवासी जमाती आहेत. आदिवासी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य ही त्यांच्या समाजजीवनाची ओळख आहे. वारली चित्रकारी आदिम काळापासून म्हणजे जेव्हा मनुष्य वास्तव्य करीत होता त्या काळापासून जतन केलेली आहे. तसेच बिरसा मुंडा ऐन तारुण्याच्या काळात, ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरुद्धच्या चळवळीचा एक भाग होते. भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील क्रांतिकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे बिरसा मुंडा हे सुप्रसिद्ध असून आदिवासी समाजाचे वीर नायक अशी त्यांची ओळख आहे.

 

१९व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्ये कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतिकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यानुसार पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे या नवीन पालघर जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या समोर म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारा जवळ क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा असला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्या अनुषंगाने आदिवासी समाजाच्या भावना ओळखून १९ ऑगस्ट २०२१ रोजीच्या उद्घाटनाच्या आधी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या समोर म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारा जवळ क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा स्थापन करावा असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी ईमेल द्वारे पत्र मुख्यमंत्री, महसूल मंत्री, आदिवासी विकास मंत्री, सिकडो, संबंधित विभागाचे प्रधान सचिव यांच्या सह पालघर जिल्हाधिकारी यांना पाठवून मागणी केली आहे.


Tags: chief minister uddhav thackerayCIDCODahanuvinod nikoleआदिवासी विकास मंत्रीआमदार कॉम्रेड विनोद निकोलेडहाणू विधानसभापालघरसिकडो
Previous Post

अग्निशमन दल, गृहरक्षक दल आणि नागरी सेवा कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके

Next Post

भारतीय स्टेट बँकेत ६८ जागांसाठी भरती

Next Post
sbi

भारतीय स्टेट बँकेत ६८ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!