Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ हे पुस्तक नव्या पिढीसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

गृहविभागाचे प्रधान सचिव विनित अग्रवाल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

February 18, 2021
in सरकारी बातम्या
0
Hon Dy CM Ajit Pawar Sir inauguration of Hinduism Beyond Ritualism 3

मुक्तपीठ टीम         

            मुंबई, दि. 18 : समाज एकसंघ ठेवण्यासाठीचा संदेश असलेले ‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ हे पुस्तक

नवीन पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

         सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित गृहविभागाचे प्रधान सचिव विनित अग्रवाल यांनी लिहिलेले पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी श्री.पवार बोलत होते. यावेळी गृहविभागचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेखक तथा प्रधान सचिव विनित अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

Dy CM Ajit Pawar inauguration of Hinduism Beyond Ritualism 1

          उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, या पुस्तकाद्वारे वाचकांना नवी दिशा मिळेल. पुस्तकाचे लेखक श्री.अग्रवाल हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांनी अतिशय विचारपूर्वक व मेहनतीने हे पुस्तक लिहिले आहे. सर्वांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात आपण काम करीत असलो तरी मनात लपलेला लेखक वेळात वेळ काढून लिहितोच त्यातूनच श्री.अग्रवाल यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी श्री.अग्रवाल यांचे कौतुक केले.

            प्रास्तविकात विनित अग्रवाल म्हणाले, समाजात वावरत असताना पडलेले विविध प्रश्न, त्याचे उत्तर शोधण्यामागची धावपळ, ही यामागील प्रेरणा आहे. 251 पाने असलेल्या पुस्तकात 30 वेगवेगळे पाठ (चॅप्टर) असून विविध उपनिषदे यात ईशउपनिषद, सांख्ययोग यावरील भाष्यही आहे. तसेच प्रश्नोत्तरेदेखील आहेत.

            कार्यक्रमास प्रधान सचिव, सचिव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

लेखकाविषयी माहिती

          राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव असलेले विनित अग्रवाल हे आय आय टी (दिल्ली) मधून अभियांत्रिकी पदवीधर आहेत. तसेच त्यांनी मॅनेजमेंटमध्ये उच्च पदवी मिळविली आहे. काही काळ कार्पोरेट क्षेत्रात काम केले. त्यानंतर ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. सी.बी.आय. तसेच राज्य शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण पदावर त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. पोलीस दलातील मानाचे व प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पोलीस पदक त्यांना मिळाले आहे.

          विनित अग्रवाल हे मान्यवर लेखक आहेत. विश्लेशणात्मक शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना तेथील अनुभवावर त्यांनी “रोमांस ऑफ अ नक्शलाईट” हे पहिले पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचे स्वागत माध्यम तसेच जनेतेने केले. तद्नंतर त्यांनी महाभारतावर आधारीतर “ऑन दि ईव्ह ऑफ कलयुग” हे काव्यनाटय असलेले पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकासही उत्तम प्रतिसाद लाभला आणि आता हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

000


Tags: ajit pawarDy CM Ajit Pawar inauguration of Hinduism Beyond Ritualism 1hinduism beyond ritualismvinit agrawalअजित पवारविनित अग्रवालहिंदुइझम बियॉन्ड रिच्युअॅलिझम
Previous Post

अजिंठाजवळील फर्दापूर येथे उभारल्या जाणाऱ्या ‘भीमपार्क’साठी चांगल्या सूचना

Next Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – गुरुवार, १८ फेब्रुवारी २०२१ • आज राज्यात ५,४२७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान. • आज २,५४३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,८७,८०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.५% एवढे झाले आहे. • राज्यात आज ३८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४८ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५५,२१,१९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,८१,५२० (१३.४१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात २,१६,९०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. • राज्यात आज रोजी ४०,८५८ सक्रिय रुग्ण आहेत

Next Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट - गुरुवार, १८ फेब्रुवारी २०२१ • आज राज्यात ५,४२७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान. • आज २,५४३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,८७,८०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.५% एवढे झाले आहे. • राज्यात आज ३८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४८ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५५,२१,१९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,८१,५२० (१३.४१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात २,१६,९०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. • राज्यात आज रोजी ४०,८५८ सक्रिय रुग्ण आहेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!