मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर शिवसंग्राम संघटनेचे नेत विनायक मेटेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिलं ते व्यर्थ ठरलं आहे. मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी या सरकारची होती. मराठा आरक्षण उपसमितीचे अशोक चव्हाण यांची होती. त्यांनी याबाबत गांभिर्याने लक्ष दिलं नाही. अशोक चव्हाण यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असं विनायक मेटे यांनी म्हटले आहे.
मराठा समाज हे पाप सहन करणार नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाने आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे. आणखी किती बलिदान सरकार घेणार आहे, असा सवाल विचारत आता समाज गप्प बसणार नाही, असा इशाराही मेटेंनी दिला आहे.