मुक्तपीठ टीम
दिवाळीचा सण म्हणजे उत्साहाचा, जल्लोषाचा आणि दीपप्रज्वलनाचा. सगळीकडे रोशनाई अगदी शोभून दिसते. दिवाळीला दीपोत्सवाबरोबरच फटाकेही फोडले जातात. मात्र पर्यावरण आणि वाढते प्रदूषण पाहता अनेक राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ज्याला प्रचंड विरोधही होताना दिसत आहे. याच्या निषेधार्थ अनेक जण फटाक्यांशिवाय दिवाळीच काय, असेही म्हणत आहेत. एकीकडे फटाके फोडण्याविरोधात आंदोलने होत आहेत, तर दुसरीकडे देशात अशी गावे आहेत जिथे वर्षानुवर्षे फटाक्यांविना दिवाळी साजरी होते. तामिळनाडूतील काही गावही अशीच आहेत.
फटाक्यांविना दिवाळी साजरं करणारं तामिळनाडूतील एक गाव!
- तमिळनाडूमध्ये वेट्टागुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टीसह अशी अनेक गावे आहेत ज्यामुळे संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटेल.
- या गावांमध्ये दिवाळीनिमित्त फटाके फोडले जात नाहीत.
- या गावांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांमुळे दिवाळीत फटाके फोडले जात नाहीत.
- एका स्थानिकाने सांगितले, मी ७५ वर्षांचा आहे आणि मी कधीच दिवाळी साजरी केली नाही कारण हे आमच्या पक्ष्यांचे घर आहे.
- ही गावे तामिळनाडूतील वेतांगुडी पक्षी अभयारण्यापासून जवळ आहेत.
पक्ष्यांना भरभरून प्रेम तर, वटवाघुळांची पूजा या गावातील गावकरी करतात…
थप्पुपट्टी आणि संपत्ती ही तामिळनाडूतील गावे आहेत जिथे दिवाळीनिमित्त फटाके फोडले जात नाहीत. फटाक्यांवर बंदी घालण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अलीकडच्या काळात आला आहे, परंतु फटाक्यांचा आवाज आणि त्यातून निघणाऱ्या धुराचा पक्ष्यांना त्रास होत असल्याने या गावांमध्ये वर्षानुवर्षे फटाक्यांची दिवाळी साजरी होत नाही. या गावांमध्ये वटवाघुळांची पूजा केली जाते.