Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लेक्चरर तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्याचं प्रकरण: नराधम विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Vikesh Nagrale

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील लेक्चररला पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या विकेश नगराळे या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. खरंतर पोलिसांनी या नराधमाची क्रुरता लक्षात ठेवून फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली होती. तर बचाव पक्षाने या प्रकरणी तपास नीट झालेला नसून दोषीला कमीत- कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. विकीने अंकिता या २४ वर्षीय लेक्चरर तरुणीला जिवंत जाळले होते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

 

विकेश नगराळेचं नराधम क्रौर्य!

  • अंकिता हिंगणघाटच्या महाविद्यालयात वनस्पतीशास्त्राची अर्धवेळ प्राध्यापक होती.
  • ३ फेब्रुवारी २०२०ला दारोडा या आपल्या गावातून ती सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली.
  • त्यावेळी आरोपी विकेशने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.
  • नागपूरच्या खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले.
  • घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तेथून पुढील उपचारासाठी नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात नेण्यात आले.
  • अंकिताचा चेहरा, टाळू, मान, उजवा खांदा, डावा हात, पाठीचा वरचा भाग, डोळे आणि श्वसनसंस्था गंभीरपणे भाजली. अखेर १० फेब्रुवारीला अंकिताने अखेरचा श्वास घेतला.

एसआयटीने केली होती चौकशी

  • नागराळे यांना घटनेच्या तीन दिवसांनंतर नागपूरजवळील टाकळघाट येथून अटक करण्यात आली.
  • या खळबळजनक घटनेचा परिणाम राज्यभरात दिसून आला.
  • जनआंदोलने सुरू झाली.
  • हिंगणघाट आणि आजूबाजूच्या शहरांतील रहिवाशांनीही बाजार बंदची हाक दिली होती, त्यानंतर या भागातील नियमित कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते.
  • महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
  • त्यानंतर त्यांनी या घटनेच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले.

 

१९ दिवसात ४२६ पानांचं दोषाारोप पत्र, २९ साक्षी!

  • उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी १९ दिवसात दोषारोप पत्र पूर्ण केले.
  • हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात ४२६ पानांचे दोषाारोप पत्र सादर झाले.
  • शासनाने या प्रकरणात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची खास नियुक्ती केली.
  • एकूण २९ साक्षीदार तपासण्यात आले.
  • घटनेपासून आरोपी कारागृहातच आहे.
  • महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला २ वर्ष पूर्ण होताना बुधवारी आरोपीला दोषी ठरवले होते पण गुरुवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Tags: Vikesh NagraleWardhaवर्धाविकेश नगराळेहिंगणघाट
Previous Post

विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नामुळे हरवलेला अल्पवयीन मुलगा सहीसलामत पालकांच्या ताब्यात

Next Post

राज्यात नवे रुग्ण ६ हजार २४८! १८ हजार ९४२ रुग्ण बरे!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात नवे रुग्ण ६ हजार २४८! १८ हजार ९४२ रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!