मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील लेक्चररला पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या विकेश नगराळे या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. खरंतर पोलिसांनी या नराधमाची क्रुरता लक्षात ठेवून फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली होती. तर बचाव पक्षाने या प्रकरणी तपास नीट झालेला नसून दोषीला कमीत- कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. विकीने अंकिता या २४ वर्षीय लेक्चरर तरुणीला जिवंत जाळले होते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
विकेश नगराळेचं नराधम क्रौर्य!
- अंकिता हिंगणघाटच्या महाविद्यालयात वनस्पतीशास्त्राची अर्धवेळ प्राध्यापक होती.
- ३ फेब्रुवारी २०२०ला दारोडा या आपल्या गावातून ती सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली.
- त्यावेळी आरोपी विकेशने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.
- नागपूरच्या खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले.
- घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तेथून पुढील उपचारासाठी नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात नेण्यात आले.
- अंकिताचा चेहरा, टाळू, मान, उजवा खांदा, डावा हात, पाठीचा वरचा भाग, डोळे आणि श्वसनसंस्था गंभीरपणे भाजली. अखेर १० फेब्रुवारीला अंकिताने अखेरचा श्वास घेतला.
एसआयटीने केली होती चौकशी
- नागराळे यांना घटनेच्या तीन दिवसांनंतर नागपूरजवळील टाकळघाट येथून अटक करण्यात आली.
- या खळबळजनक घटनेचा परिणाम राज्यभरात दिसून आला.
- जनआंदोलने सुरू झाली.
- हिंगणघाट आणि आजूबाजूच्या शहरांतील रहिवाशांनीही बाजार बंदची हाक दिली होती, त्यानंतर या भागातील नियमित कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते.
- महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
- त्यानंतर त्यांनी या घटनेच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले.
१९ दिवसात ४२६ पानांचं दोषाारोप पत्र, २९ साक्षी!
- उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी १९ दिवसात दोषारोप पत्र पूर्ण केले.
- हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात ४२६ पानांचे दोषाारोप पत्र सादर झाले.
- शासनाने या प्रकरणात अॅड. उज्ज्वल निकम यांची खास नियुक्ती केली.
- एकूण २९ साक्षीदार तपासण्यात आले.
- घटनेपासून आरोपी कारागृहातच आहे.
- महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला २ वर्ष पूर्ण होताना बुधवारी आरोपीला दोषी ठरवले होते पण गुरुवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.