Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पुरस्थितीत मदतीसाठी सर्व यंत्रणा सतर्क”: विजय वडेट्टीवार

July 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
vijay wadettiwar

मुक्तपीठ टीम

रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्हयातील पुरस्थितीत मदतीसाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून सर्व प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत सर्व तैनात असलेल्या यंत्रणा सध्या युध्दपातळीवर काम करत आहेत. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयात एनडीआरएफ च्या प्रत्येकी दोन अशा एकूण चार पथके रवाना होत आहेत. तर ठाणे येथे तीन व पालघर येथे एक टीम पोहचली आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदतसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

 

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, कोयना धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग व वशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण व खेड या शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. पुरामुळे प्रभावीत झालेल्या भागातील मदतीसाठी एनडीआरएफच्या टीम लवकरच पोहचेतील यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रयत्नशील आहे.तसेच जिल्हाधिकारी यांनी कोस्टगार्ड व वायुदलाचीही मागणी केली आहे.

 

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, रायगड जिल्हयातील कर्जत व महाड हा परिसरही जलमय झालेला आहे. तेथील जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहिती नुसार सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूर जिल्हयातही मुसळधार पावसामुळे शाहुवाडी व गगनबावडा तालुक्यातील काही परिसर जलमय झालेला आहे. सिंधुदुर्गला गगनबावडयामार्गे होणारी वाहतूक थांबवली आहे. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहिती नुसार, सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. या भागातही एनडीआरएफ ची दोन पथके मदतीसाठी रवाना झाली आहेत. ठाणे जिल्हयात झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण व भिंवडी काही परिसरात पाणी साचले आहे. या भागात मदतीसाठी एनडीआरएफची तीन पथके टीम मदतीसाठी पोहचली आहेत. या भागातही पाऊसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थीती नियंत्रणात येत आहे असेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

मुंबईत दोन एनडीआरएफच्या टीम असून एक टीम नागपूर मध्ये तर सात टीम पुणे येथे आहेत. जिल्हयामधील सर्व यंत्रणांकडून तात्काळ नागरिकांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारी यांनी स्पष्ट केले आहे.

 


Tags: Heavy rainKonkanmumbaiएनडीआरएफमुंबईविजय वडेट्टीवारी
Previous Post

“उत्तर प्रदेशाचा कोरोनावर अभूतपूर्व विजय, महाराष्ट्राने अनुकरण करण्याची गरज”: राम नाईक

Next Post

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Next Post
CM Thackeray

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!