Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ दत्तप्रसाद दाभोळकर – एक अफलातून रसायन

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
Dr. Dattaprasad Dabholkar

विजय मांडके

 

महात्मा गांधी म्हणाले होते की त्यांना १२५ वर्षे जगायचे आहे , भरपूर कामे करायची आहेत. पण त्यांना मारण्यात आले. मी महात्मा गांधी यांचा अनुयायी आहे त्यामुळे मी ८३ व्या वर्षातून ८४ व्या वर्षात पदार्पण केले म्हणजे मला अजून ४२ वर्षे जगायचे आहे. आणि त्यादृष्टीने उरलेल्या वर्षांचे नियोजन करीत आहे. आणि हे नियोजन तू ( विजय मांडके) आणि मिनाज (होय मिनाज सय्यद) बरोबर असलात की नक्की पूर्णत्वास देऊ याची मला खात्री आहे.

Dr. Dattaprasad Dabholkar

हे संभाषण माझे आणि ज्येष्ठ विचारवंत , वैज्ञानिक , लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्यातील आज सकाळचे आहे. त्यांना मी आज वाढदिवसाच्या सदिच्छा देण्यासाठी फोन केला. त्यावेळी ते माझ्याशी बोलत होते. डॉ दत्तप्रसाद दाभोळकर हे अफलातून व्यक्तिमत्व आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर व त्यांच्या विचारावर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. स्वामी विवेकानंदांचे जातीअंताचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये

  • छाया (कवितासंग्रह)
  • ढगांमागून गडगडत (बालगीतसंग्रह)
  • तुम्हाला विज्ञान युगात जगायचंय
  • दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत
  • ना डावं ना उजवं (काश्मीर, रा.स्व.संघ आणि इतर लेख)
  • प्रकाशवाटा : दुर्गा भागवत आणि नानाजी देशमुख (यांची चरित्रे)
  • बखर राजधानीची (समग्र)
  • माते नर्मदे (नर्मदा बचाव आंदोलनावरील पुस्तक)
  • राजधानी इंद्रप्रस्थ
  • विज्ञानेश्वरी (वैज्ञानिक गल्पमाला). (याच नावाचा एक ग्रंथ रवीन थत्ते यांचा आहे, मात्र तो संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीसंबंधात आहे.)
  • शोध स्वामी विवेकानंदांचा
  • समग्र माते नर्मदे (नर्मदा बांधविरोधी आंदोलनावरील पुस्तक) यांचा उल्लेख करावा लागेल.
  • विशेष म्हणजे भानू काळे यांनी ” रंग याचा वेगळा ” दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन हे व्यक्तिचित्रण प्रकाशित केले आहे.

 

आता त्यांचा सुमारे साडेतीनशे पानांचा स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेणारा आगळा वेगळा ग्रंथ प्रकाशित होत आहे. प्रकाशकाकडे तो पाठवण्यातही आला आहे. अतिशय उत्साही, अभ्यासु, हरहुन्नरी असा हा माणूस आहे. अनेक पैलूंवर व अनेक विषयावर अभ्यासपूर्ण मत व्यक्त करणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे
मुळात सर्वच दाभोळकर बंधू हे त्यांचे त्यांचे वैशिष्ट्य कायम ठेवून समाजात वावरत आलेले आहेत.

Dr. Dattaprasad Dabholkar

डॉ दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या सातारा येथील निवासस्थानाचे नावच ” या ” असे आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्याचे स्वागतही अतिशय दिलखुलासपणे होत असत अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांच्यापासून ते पत्रकार निखिल वागळे, भानू काळे यांच्यापर्यंत त्यांचे स्वागत केले जाते. साताऱ्यातील अरुण गोडबोले, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, विश्वास दांडेकर, किशोरशेठ नावंधर, बाळासाहेब जाजू ही त्यांची खास माणसे म्हणून ओळखली जातात.

 

सातारा येथे पैगंबर जयंती निमित्त होणारा सर्वधर्म भाईचारा सभेचा कार्यक्रम असू देत किंवा परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीचा कोणताही कार्यक्रम असू देत त्यात आपला वाटा उचलणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा. त्यांच्या हातून जातिअंताच्यासाठी प्रबोधनाचे काम सातत्याने होत राहो. याच सदिच्छा.

 

vijay mandake

(विजय मांडके हे मराठीतील प्रिंट, टीव्ही माध्यमात गेली तीन दशके सक्रिय असणारे व्यासंगी पत्रकार आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते अनेक उपक्रमांना सहकार्य करतात.)


Tags: Dr. Dattaprasad Dabholkarvijay mandakeविजय मांडके
Previous Post

प्राथमिक केंद्रांमधील कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी टास्क फोर्सचा संवाद

Next Post

राज्यात नव्या रुग्णांचे प्रमाण घटतंय…पण पश्चिम महाराष्ट्रात एक तृतीयांश नवे रुग्ण!

Next Post
MCR 1-5-21

राज्यात नव्या रुग्णांचे प्रमाण घटतंय...पण पश्चिम महाराष्ट्रात एक तृतीयांश नवे रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!