मुक्तपीठ टीम
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तांचे अवतार मानले जातात. अक्कलकोटचे महाराज म्हणून देखील स्वामींना ओळखलं जातं. या स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. सोलापुरला जावू न शकणाऱ्या अशा भक्तांसाठी मुंबईतील पारशीवाड्याच्या शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अक्कलकोटचा मठ आणि मंदिर साकारलं आहे. तिथं तुम्ही गणपती बाप्पांसोबतच तुम्हीही श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ शकता. या वर्षी मंडळाने अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ मठ व मंदिराचा देखावा साकारला आहे. या वर्षी मंडळाच्या उत्सवांचं ५९वं वर्ष आहे.
मंडपाच्या प्रवेशाला अक्कलकोट येथे असलेल्या मंदिरासारखंच प्रवेशद्वार बनवलं आहे. आत जाताच लोकमान्य टिळक व छत्रपची शिवीजी महाराजांची मुर्ती ठेवण्यात आली आहे. तुळशी वृंदावनामुळे मंडपाची शोभा अधिकच वढली आहे. स्वामींच्या मंदिरात प्रवेशाआधी स्वामींचे गुरुस्थान उभारण्यात आले आहे. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे” असे मुख्य प्रवेशद्वारावर लिहिण्यात आले आहे. आत जाताच डाव्या भिंतीवर स्वीमींच्या तारक मंत्रातील काही वाक्यं भविकांना चांगली प्रेरणा मिळावी म्हणून लिहिण्यात आली आहेत. पुढे जाताच श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ बनवला आहे. आकर्षक झुंबरही लावण्यात आले आहे. मंदिराचा देखावा जसाच्या तसा बनवण्यात आला आहे. मंदिरांचे स्तंभ, खिडक्या दरवाजे अगदी खरे खरे साकारले आहेत. एकीकडे समाधी मठ तर दुसरीकडे स्वामींचा मठ उभारण्यात आलं आहे. मंदिरीच्या मध्यभागी एक वटवृक्ष उभारण्यात आला आहे. त्या औदुंबराच्या कट्ट्यावर स्वामी बसलेले आहेत आणि एका बाजूला दिवा लावण्यात आला आहे.
मंडळाच्या कार्यात प्रमुख सल्लागार माजी आमदार सिताराम दळवी, सदस्य रुपेश कुऱ्हाडे, संदीप आंबेकर, कन्हैया पटेल, प्रथमेश घाणेकर, हर्षद घाडगे व इतरांचा सक्रिय सहभाग आहे.
उत्सवाच्या आयोजनाबरोबरच हे मंडळ वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही सक्रिय असते. या मंडळाने गरजू लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे. मंगळवारी मंडळातर्फे महाप्रसाद भंडारा ठेवण्यात आला होता. त्याचा लाभ हजारोंनी घेतला. आज बुधवारी श्री क्षेत्र अक्कलकोठ येथून स्वामींच्या पादुका येणार आहेत. जेणेकरीन भाविकांना त्याचे दर्शन घेता येईल. अक्कलकोटच्या स्थानातची हुबेहुब प्रतिकृती साकारल्यामुळे मंदिरातून पाय बाहेर निघता निघत नाही. तुम्ही ही नक्की या मंडळाला भेट द्या…आणि गणपती बाप्पासह स्वामींचंही दर्शन घ्या.