मुक्तपीठ टीम
उन्हाळ्यात पाणी जास्त प्यायले पाहिजे असा सल्ला अनेकदा डॉक्टर देतात. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही कडक उन्हात पाण्याची गरज वाढते. पण अनेकदा जंगलात तशी सोय नसते. अशावेळी प्राणी तहानेनं कासाविस होत असतात. अनेकदा मग ते मानवी वस्त्यांकडे वळतात. काही प्राणी मानवी वावर असणाऱ्या रस्त्यांवरही पोहचतात. अशाच एका तहानलेल्या माकडाला पाणी पाजतानाचा पोलीस शिपाई संजय घुडे यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी तो व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक तहानलेले माकड कडाक्याच्या उन्हात रस्त्यावर बसलेले दिसत असून एक वाहतूक हवालदार त्याला हाताने पाणी देत आहेत.
आयएएस अवनीश शरण यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, या मुक्या जनावराला पाणी देणाऱ्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलचे नाव संजय घुडे आहे. आवाजहीन माकड अतिशय आरामात बाटलीतून पाणी पीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. संजय खाली बसले तरी माकड घाबरून त्यांच्यापासून दूर पळत नाही, तर पाणी पिताना दिसतो.
ट्रॅफिक कॉन्स्टेबल संजय घुडे यांनी सर्वांची मने जिंकली
- ट्रॅफिक कॉन्स्टेबलने ड्युटीच्या वेळी त्या अवाक माकडाला पाणी दिल्याचे लोकांनी ट्विटरवर पाहिले तेव्हा त्यांच्या माणुसकीचे कौतुक होऊ लागले.
- एका युजरने लिहिले की, ‘तहानलेल्याला पाणी देणे हे सर्वात मोठे धर्माचे काम आहे आणि तेही जेव्हा तो अवाक असतो.’
- आपल्या कर्तव्यासोबतच माणूस म्हणून कर्तव्यही बजावलं पाहिजे, जे संजय यांनी पार पाडलं आणि मुक्या जनावराला पाणी दिलं.