Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#व्हाअभिव्यक्त …तर “पुण्यातील ‘वशाटोत्सव’ व नाशिकचे ‘साहित्य संमेलन’ही रद्द करा!”

February 20, 2021
in व्हा अभिव्यक्त!
0
vashatotsav

संतोष शिंदे

महाराष्ट्रात शिवजयंतीनिमित्त हजारो कार्यक्रम होत असतात. शिवप्रेमी कार्यकर्ते शिवजयंतीच्या निमित्ताने प्रबोधनाचे हजारो कार्यक्रम आयोजित करतात. गावागावात व्याख्यान, पोवाडे, स्पर्धा, प्रबोधनाचे इतर कार्यक्रम हे लाखो रुपये खर्च करून आयोजित करतात. कार्यक्रम पत्रिके पासून सभागृह आणि वाक्त्याच्या मानधनात तोपर्यंत सगळे (बुकिंग) कार्यक्रम ठरलेले असताना सरकारने अचानक शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा आदेश काढला. त्यामुळे हजारो शिवप्रेमींचे लाखो रुपये पाण्यात गेले. हा शिवद्रोही सरकारचा दुर्दैवी निर्णय होता. उलट शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवप्रेमींना महाराष्ट्र सरकार पोलिसांकडून प्रचंड त्रास देत आहे.

नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार ५० लाख रुपये देणार आहे. मा. छगन भुजबळ स्वागताध्यक्ष असल्यामुळे त्यांनी नाशिक मनपा व जिल्हा परिषद यांना प्रत्येकी 50 व 25 लाख रुपयांची दबाव टाकून मागणी केलेली आहे. “ज्या महात्मा फुलेंनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला भटा-बामणांचे संमेलन आहे, इथे आमच्या लोकांचे प्रश्न सुटत नाही, त्यांची चर्चा होत नाही… अशा संमेलनाला आम्ही जात नाहीत…” अशी भूमिका घेतली होती, अशा साहित्य संमेलनाला ते आमंत्रण असून सुद्धा गेले नाहीत…” त्याच महात्मा फुले यांच्या नावाने ‘समता परिषद’ काढून मा. छगन भुजबळ महाराष्ट्रात काम करतात आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष केल्यानंतर “माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंद आहे…” अशी जाहीर चर्चा करतात, हा फुलेंच्या विचारांचा पराभव आहे. मात्र आम्ही शिवप्रेमी कार्यकर्ते फुले यांच्या विचारांचा पराभव होऊ देणार नाहीत. उलट गावागावात जाऊन शिवराय-फुले- शाहू -आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करू…!! म्हणून महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करावे अशी संभाजी ब्रिगेड ची भूमिका आहे.

साहित्य संमेलनाचा ५० लाख रुपये अनुदान राज्यातील जनतेच्या आरोग्यावर खर्च करावे. तसेच मा. शरद पवार, मा. संजय राऊत, मा. जितेंद्र आव्हाड उपस्थित असणारा चांदणी चौकातील २० तारखेचा 1000 लोकांचा ‘वशाटोत्सव’ सुद्धा महाराष्ट्र सरकार व पुणे पोलिसांनी रद्द करावा. कारण त्या तिथे ठिकाणी सुद्धा हजारो लोक जमणार आहेत. जर शिवजयंती उत्सवाचे राज्यातील कार्यक्रम रद्द होत असतील तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व वशाट उत्सव आणि इतर कार्यक्रम सुद्धा इथून पुढच्या काळातील रद्द झाले पाहिजेत… अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे.

santosh shinde sambhaji brigade

(लेखक संतोष शिंदे हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक आहेत)

 

(राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सुचनेवरून पुण्यातील वशाटोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. संतोष शिंदे यांनी हा लेख त्यापूर्वी लिहिला आहे)


Tags: sambhaji brigadesantosh shindeVha Abhivyaktव्हा अभिव्यक्तसंतोष शिंदेसंभाजी ब्रिगेड
Previous Post

महामार्गांवर फास्टॅग जोमात, २ हजार ३०० कोटी जमा

Next Post

तारापुरात सांडपाणी प्रक्रिया सुरू होणार, प्रदूषणावर नियंत्रणाची शक्यता

Next Post
tarapur

तारापुरात सांडपाणी प्रक्रिया सुरू होणार, प्रदूषणावर नियंत्रणाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!