Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तारापुरात सांडपाणी प्रक्रिया सुरू होणार, प्रदूषणावर नियंत्रणाची शक्यता

February 26, 2021
in चांगल्या बातम्या
0
tarapur

मुक्तपीठ टीम

 

प्रदूषणामुळे त्रासलेल्या तारापूर परिसरातील नागरिकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. त्याचबरोबर उद्योगांवर परिणाम झाल्याने त्रासलेल्या उद्योजकांसाठी चांगलीच बातमी आहे. काही उद्योजक औद्योगिक सांडपाणी तसेच सोडत असल्यामुळे परिसरात जलप्रदूषण वाढले होते. त्यामुळे कारवाईही झाली. त्यानंतर आता अखेर जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राला पुन्हा कार्यरत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक निर्बंध घातले आहेत. पण तरीसुद्धा हे प्रक्रिया केंद्र सुरू झाल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे दुरुस्तीचे काम नोव्हेंबर २०२० सुरू होते. केंद्रातून योग्य पद्धतीने सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी केली होती.

 

प्रक्रिया केंद्रातील साडेसात दशलक्ष लिटर क्षमतेच्या भागाचे नूतनीकरण देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. प्रक्रिया केंद्रातील या भागाला सुरू करून प्रक्रिया क्षमता साडेबारा दशलक्ष घनमीटर प्रतिदिनपर्यंत वाढवण्याची अनुमती दिली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या परवानगीत तसे नमूद केले आहे. हे प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची अनुमती मिळाल्याने जवळजवळ तीनशे ते चारशे उद्योगांना चालना मिळणार आहे. तारापूर एनव्हार्मेन्ट प्रोटेक्शन सोसायटीने सुरू केलेल्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राशी १८० ते २०० उद्योग जोडले गेले आहेत.

सांडपाण्याची मात्रा, संतुलन व दर्जा ऑनलाइन पद्धतीने तपासण्याची व्यवस्था कऱण्याची अट घालण्यात आली आहे. अनेक उद्योगांच्या प्रदूषणामुळे सांडपाण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे ज्या उद्योगांमध्ये अधिक प्रमाणात सीओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड)ची निर्मिती होते त्याकरिता स्वतंत्र सांडपाणी प्रकियेची व्यवस्था उभारण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: pollution controlSewage treatmenttarapurतारापुरप्रदूषणसांडपाणी प्रक्रिया
Previous Post

#व्हाअभिव्यक्त …तर “पुण्यातील ‘वशाटोत्सव’ व नाशिकचे ‘साहित्य संमेलन’ही रद्द करा!”

Next Post

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी पुढच्या आठवड्यात आढावा बैठक

Next Post
karnala bank 19-2-21

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी पुढच्या आठवड्यात आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!