मुक्तपीठ टीम
मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील एका शाळेनं विद्यार्थी पालक आणि परिसरातील सामान्य नागरिकांच्या लसीकरणासाठी खास प्रयत्न सुरु केले आहेत. वर्सोवा वेल्फेअर ट्रस्टच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं आहे. मुंबई मनपाच्या को-वॅक्सिन लस देणाऱ्या कुपर, बीकेसी, नायर वगैरे सात मोजक्या केंद्रांच्या जोडीला हे ती लस देणारे आठवे केंद्र आहे. मुंबई मनपा के पश्चिम विभाग आणि अदिती पुरी चॅरिटेबल ट्रस्टचे दिनेश पुरी यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच पालक आणि परिसरातील सर्वसामान्यांसाठी ही सुविधा फायद्याची ठरणार आहे.
मुंबईचे माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अध्यक्षतेखालील शाळेला लसीकरणासाठी अदिती पुरी चॅरिटेबल ट्रस्टचे दिनेश पुरी यांचं सहकार्य लाभलं आहे. मंगळवारी मुंबई मनपाच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांच्याहस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. सामान्यांपैकी अनेकांना आजही ऑनलाइन नोंदणी करणे जमत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी खास ऑफलाइन वॉक इन लसीकरणाचीही सोय करण्यात आलीय.
आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी उद्घाटनपर भाषणात लसीकरणासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या जोरदार प्रयत्नांची माहिती दिली. मुंबईतील प्रत्येक नागरिकाला सुरक्षा देण्यासाठी मनपाचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. अदिती पुरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लसीकरणात मुंबई मनपा केल्या जाणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी दिनेश पुरी यांचे आभार मानले. तसेच मुंबई मनपाच्या के पश्चिम विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. अजित पंपटवार यांनी कोरोना संकटकाळात करत असलेल्या कार्याचं त्यांनी कौतुक केलं. लसीकरण केंद्राची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या वर्सोवा वेल्फेअर ट्रस्टच्या विश्वस्तांचं, शिक्षकांची भूमिका ही शिक्षण कार्यातही सामान्यांना साथ देण्याची असते असा त्यांनी उल्लेख केला.
माजी उपमहापौर अरुण देव हे भाजपाचे नेते असूनही पक्षातीत भूमिकेतून सामाजिक कार्यात सहभागी असल्याचं वैशिष्ट्यही त्यांनी मांडलं.
माजी उपमहापौर अरुण देव यांनी आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल या सतत, अथक ऊर्जावान राहून करत असलेल्या कार्याचा गौरव केला.
आरोग्य अधिकारी डॉ. अजित पंपटवार यांनी लसीकरणाच्या नियोजनासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांना सुचना दिल्या. तसेच मुंबई मनपाने झोपडपट्टी परिसरातील कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांची माहिती दिली. दुसऱ्या लाटेत इमारतींमध्ये कोरोना संसर्ग वाढता दिसल्याने त्याबद्दल त्यांनी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
Inaugrated Covid Vaccination center at Versova Education trust in association with Aditi Puri trust at Aaram Nagar Versova #Mumbai
Only Covaxin will given at this location by BMC enabling speedy vaccinationShri Arun Deo, Tulsidas Bhoite, Rajan Chandok were present@AUThackeray pic.twitter.com/uMe1bSTMI1
— Rajul Patel (@MeRajulTai) September 7, 2021
या कार्यक्रमाला मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे, प्रा. अनिल सिंह, मॅनेजिंग ट्रस्टी राजन चंडोक, प्रा. ममता थोरात, अॅड. गोपाळ हेगडे, डॉ. क्षितिज मेहता, पिंकी भंसाली, प्राचार्य शिल्पा तलवार, प्राचार्य प्रो. संतोष तिवारी, शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये हेही उपस्थित होते.
(छायाचित्र आणि व्हिडीओ सौजन्य – प्रा. हेमांगी खरे)
शाळेतील लसीकरण बातमीसाठी पाहा व्हिडीओ: