Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वीणा श्रीनिवासांनी महाराष्ट्राच्या नव्या पोस्टमास्टर जनरल म्हणून कार्यभार स्वीकारला

December 12, 2021
in घडलं-बिघडलं, विशेष
0
veena shrinivas

मुक्तपीठ टीम

वीणा आर. श्रीनिवास यांनी महाराष्ट्र सर्कलच्या ‘मुख्य पोस्टमास्टर जनरल’ या पदाचा कार्यभार कार्यभार स्वीकारला आहे. त्या सन १९९१ च्या बॅचच्या भारतीय टपाल सेवा अधिकारी आहेत. त्यांनी सन २००२ ते २००४ पर्यंत आशियातील सर्वात मोठे पोस्ट आॅफिस ‘मुंबई जीपीओ’च्या संचालकपदाची मोठी जबाबदारी पार पाडली आहे.

त्यांची उच्च प्रशासकीय श्रेणीत पदोन्नती झाल्यामुळे या पदावर ८ डिसेंबर रोजी रुजू झाल्या. त्यांनी ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’शी संलग्न असलेल्या पुणे येथील ‘गोकुळ इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ येथून त्यानीअर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबई विद्यापीठातूनही अर्थशास्त्रात एमए आणि कायद्याची पदवीही घेतली आहे. टपाल विभागातील रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये (पुणे) वरिष्ठ अधीक्षक म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर टपाल खात्याच्या वरिष्ठ अधीक्षक, व्यवस्थापक आॅटोमॅटिक मेल प्रोसेसिंग सेंटर (मुंबई) उपविभागीय व्यवस्थापक, पोस्टल लाइफ इन्शुरन्स (मुंबई) म्हणून या विविध पदांवर त्यांनी काम केले. कनिष्ठ प्रशासकीय दर्जाच्या पदोन्नतीवर त्यांनी कानपूर येथील पोस्टल सर्व्हिसमध्ये संचालक (निदेशक) म्हणून काम केले.

सन २००४ ते २००९ या कालावधीत त्यांनी अणुऊर्जा विभागात उपसचिव आणि मरमुगोवा पोर्ट ट्रस्टच्या मुख्य दक्षताअधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर काम केले आहे. त्यांनी डिसेंबर २००९ ते जानेवारी २०१३ या कालावधीत पोस्टल सर्व्हिसेस, गोवा आणि विदेश डाक भवन (मुंबई)या दोन्ही ठिकाणी येथे संचालक म्हणून काम केले आहे. वरिष्ठ प्रशासकीय श्रेणीतील पदोन्नतीवर, त्यांनी पोस्टमास्टर जनरल (मेल आणि व्यवसाय विकास) म्हणून बंगळुरू, पोस्टमास्टर जनरल (उत्तर कर्नाटक प्रदेश) धारवाड येथे २०१७ ते जून २०२१ पर्यंत आणि ,चेन्नई येथे पोस्टमास्टर जनरल (मेल आणि व्यवसाय विकास) मोठ्या आणि महत्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यानंतर त्यांची पदोन्नती महाराष्ट्र सर्कलमध्ये ‘सीपीजी’ म्हणून झाली.


Tags: Chief Postmaster GeneralIndian Postal Service OfficerVeena R. Srinivasभारतीय टपाल सेवा अधिकारीमुख्य पोस्टमास्टर जनरलवीणा आर. श्रीनिवास
Previous Post

‘श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’ सिरीजच्या दुसऱ्या पर्वात श्रीपादांच्या बाल लीला!

Next Post

शरद पवार यांच्या भाषणाच्या ‘नेमकचि बोलणें’ या ग्रंथाचे खासदार संजय राऊत व साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post
नेमकचि बोलणें

शरद पवार यांच्या भाषणाच्या 'नेमकचि बोलणें' या ग्रंथाचे खासदार संजय राऊत व साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!