मुक्तपीठ टीम
वैविध्यपूर्ण नैसर्गिक संसाधनाची एक जागतिक कंपनी वेदांताला या वर्षी जगातील सर्वात विश्वासार्ह अशा पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ESG) निर्देशकांपैकी एक असलेल्या डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी(™) वर्ल्ड इंडेक्सच्या सूची मध्ये सामील गेले आहे. या वर्षी भारताकडून सूची मध्ये जोडली गेलेली एकमेव कंपनी असल्यामुळे वेदांता आता सूचीतील ३३२ जागतिक कंपन्यांमधील सहा भारतीय कंपन्यांपैकी एक झाली आहे. या समावेशासह वेदांता आता अँग्लो अमेरिकन पीएलसी आणि टेक रिसोर्सेस लिमिटेड सारख्या जागतिक कंपन्यांच्या सर्वोच्च यादीत सामील झाले आहे. कंपनी १११ जागतिक कंपन्यांच्या डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इमर्जिंग मार्केटस् इंडेक्स मध्ये देखील सूचीबद्ध आहे.
एस अँड पी जागतिक कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट २०२२ च्या , जे पूर्वी डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स( डीजेएसआय) म्हणून ओळखले जात असे, धातू आणि खाण क्षेत्रात वेदांता जागतिक स्तरावर २१६ कंपन्यांपैकी सहाव्या स्थानावर आहे (९८ पर्सेंटाइल) आणि एशिया पॅसिफिकमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. वेदांता सस्टेनेबिलिटी गुणांकामध्ये १४ गुणाच्या मजबूत सुधारणे सह गेल्या वर्षीच्या तुलनेत १० क्रमांकांनी वर गेले आहे.
या यशाबद्दल बोलताना वेदांता लिमिटेडच्या नॉन एक्सिकेटिव्ह संचालक सुश्री. प्रिया अग्रवाल हेब्बर म्हणाल्या, “डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी(™) वर्ल्ड इंडेक्स आणि डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इमर्जिंग मार्केटस् इंडेक्समध्ये समाविष्ट होणे हे वेदांतासाठी सन्मानाचे आहे. जागतिक निर्देशांकामध्ये समावेश आणि आमचे सुधारलेले व आणखी वर गेलेले गुणानुक्रम हे शाश्वत भविष्यासाठी आमच्या वचनबद्धतेची साक्ष आहे. डिकार्बनायझेशन, जल संवर्धन, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, सामाजिक कल्याण आणि कर्मचाऱ्यांमधील विविधता यांवर लक्षपूर्वक कृती योजनांसह आम्ही पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ESG) क्षेत्रातील अग्रगण्य उद्योगांपैकी एक उद्योग बनण्यासाठी एक परिवर्तनात्मक प्रवास चालू करीत आहोत.”
पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय ( इ, एस आणि जी ) या तिन्ही परिमाणांमध्ये सुधारणा करून वेदांताच्या गुण संख्येने या वर्षी ६२ वरुण ७६ वर झेप घेतली आहे. पर्यावरण: ८३ ( गेल्या वर्षी पेक्षा १५ गुण अधिक), सामाजिक : ७४ ( गेल्या वर्षीपेक्षा १८ गुण अधिक) आणि प्रशासकीय: ७२ ( गेल्या वर्षीपेक्षा ११ गुण अधिक) हे विभागीय गुणांक आहेत.
डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स (डीजेएसआय) हा शाश्वततेमधील सर्वात महत्त्वाचा बेंचमार्क मानला जातो आणि तो ६१ उदयोग् क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांची एक सूची करतो. इ एस जी निर्देशांकांमध्ये दोन दशकांहून अधिक अनुभवासह डीजेएसआय सर्वात जूने, विश्वासार्ह आणि संदर्भित निर्देशांकांपैकी एक आहे.
डीजेएसआय ने सार्वजनिक आणि गैर-सार्वजनिक माहिती द्वारे पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन या निकषांवर १२० हून जास्त निर्देशांकावर २१६ जागतिक धातू आणि खाण कंपन्यांचे मूल्यांकन केले. जागतिक निर्देशांकांमध्ये, दीर्घकालीन आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक निकषांवर आधारित; एस अँड पी ग्लोबल बी एम आय मधील सर्वात मोठ्या २५०० कंपन्यांच्या पहिल्या १०% चे प्रतिनिधित्व करणाऱ्या जागतिक शाश्वतता अग्रणींचा समावेश आहे. सस्टेनेबल पद्धतींचा अवलंब करण्यात आणि पर्यावरण व समाजाचे रक्षण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात वेदांता अग्रेसर आहे. कंपनी इ एस जी मध्ये अग्रेसर होण्यासाठी सर्वसमावेशक फ्रेमवर्क तयार करीत आहे आणि तिचे प्रयत्न अशाप्रकारे जागतिक स्तरावर उत्तम गुणानुक्रम मिळण्यातून प्रतिबिंबित होते. साल २०५० पर्यंत नेट-झीरो संघटना होण्यासाठी वेदांता वचनबद्ध आहे आणि वेदांताने नेट-झीरो होण्यास गती देण्यासाठी पुढील दहा वर्षात पाच अब्ज डॉलर देण्याचे ठरविले आहे. समूहाने 1t.org या एक ट्रीलिअन ट्री प्लॅटफॉर्म मध्ये सामील होऊन वर्ल्ड इकनॉमिक फोरम सोबत भागीदारी केली आहे आणि एक मजबूत, लवचिक व संवेदनक्षम वातावरण बनविण्यासाठी ७ मिलियन झाडी लाऊन त्यांना वाढविण्याचे वचन दिले आहे.