Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“दंगल पेटवणारे ब्राह्मण, पोळणारे बहुजन!” सुजात आंबेडकरांच्या टिकेनंतर मनसेने काढले संस्कार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
MNS vs Sujat Ambedkar

मुक्तपीठ टीम

दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात, तर दंगलीसाठी रस्त्यावर उतरणारे ही बहुजन मुलं असतात, असा अनुभव आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंना आधी रस्त्यावर उतरवावं, असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. त्यांच्या त्या आव्हानाला टीव्ही9 चॅनलशी बोलताना मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, सुजात आंबेडकरांचे जातीवर बोलण्याचे वय नाही. त्यांनी आपलं आडनाव विसरू नये. मान राखावा. तसेच प्रकाश आंबेडकरांनी सुजातवर असे जातीपातीचे संस्कार करू नये, असा सल्लाही अमेय खोपकरांनी दिला.

 

सुजात आंबेडकर मनसेच्या नव हिंदुत्वाविरोधात आक्रमक

  • सुजात आंबेडकरांनी मनसेनं नव्यानं हिंदुत्वाची भूमिका घेतल्यापासून आक्रमक टीका केली आहे.
  • इतरांना सांगण्याआधी अमित राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणावी.
  • आता सुजात आंबेडकर यांनी त्यापुढची आक्रमक भूमिका घेतली आहे.
  • आतापर्यंत आपण कितीतरी दंगली बघितल्या आहेत.
  • बाबरी मशिदीपासून भीमा कोरेगावपर्यंत अनेक दंगली.
  • दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात.
  • त्यांच्यामुळे रस्त्यावर उतरणारे हे बहुजन मुलं असतात.
  • त्यामुळे राज ठाकरेंनी आधी मुलाला रस्त्यावर उतरवावं, त्याला रस्त्यावर उतरवणार नसालस तर बहुजन मुलांनाही उतरवू नये.

 

मनसेकडून सुजात आंबेडकरांना कडक प्रत्युत्तर

  • मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांना टीव्ही9मराठी चॅनलशी बोलताना त्यांनी कडक प्रत्युतर दिले आहे.
  • सुजात आंबेडकरांचे वय हे जाती-पातीवर बोलण्याचे नाही.
  • सुजातने विसरू नये की त्यांचे घराणे किती मोठे आहे.
  • मी त्यावर बोलावं इतका मोठा नाही. त्यांनी त्याचा मान राखावा. लक्षात ठेवावं आपलं आडनाव काय?
  • मला प्रकाश आंबेडकरांना सांगायचं, तुम्ही मुलावर असे संस्कार करु नका. तुम्ही जातीपातीचे राजकारण या मुलांना शिकवू नका.

Tags: Ameya KhopkarmnsSujat Ambedkarअमेय खोपकरमनसेराज ठाकरेसुजात आंबेडकर
Previous Post

मुंबईत हेल्मेटच्या गुणवत्ता तपासणीसाठी शोध मोहीम, कंपनीत जप्तीही!

Next Post

त्राटिकेचं सोंग, परंपरेची २०० वर्ष!

Next Post
त्राटिकेचं सोंग, परंपरेची २०० वर्ष!

त्राटिकेचं सोंग, परंपरेची २०० वर्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!