Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मृत्यूचे सापळे…आता विरारच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू!

April 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
Virar Hospital Fire-1

मुक्तपीठ टीम

रुग्णांना उपचारासाठी ठेवलेली रुग्णालयंच त्यांच्यासाठी मृत्यूचे सापळे ठरू लागली आहेत. भंडारा, मुंबई, नाशिक या तीन दुर्घटनांनंतर आता विरारच्या विजय वल्लभ या खासगी रुग्णालयात १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू अति दक्षता कक्षात होरपळून झाला आहे. तेथे असलेल्या एसीचा स्फोट झाल्यामुळे तेथे आग आगली, अशी माहिती रुग्णालयाचे डॉ. शाह यांनी दिली आहे.

 

नाशिकधील झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती घटल्यानंतर २४ रुग्णांचा मृत्यूची घटना ताजी असतानाच विरारच्या रुग्णालयात हे मृत्यूकांड घडलंय. तेथे विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथे विजय वल्लभहे खासगी रुग्णालय आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या एसीचा स्फोट झाला. त्यामुळे तेथे मध्यरात्रीनंतर आग लागली. यामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

 

नेमकं कसं घडलं मृत्यूकांड?

  • विजय वल्लभ हे खासगी रुग्णालय आहे
  • वसई-विरार मनपाने या रुग्णालयाला कोरोना रुग्णालयाचा दर्जा दिला आहे.
  • चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली.
  • पहाटे ३ च्या दरम्यान ही आग लागली.
  • यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते.
  • त्यापैकी फक्त चार रुग्ण आगीतून बाहेर येवू शकले, अन्य १३ रुग्ण आगीतच अडकले.
  • आगीत अडकलेल्या १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.
  • दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली.
  • ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

रुग्णालयातील भीषण आगीत होरपळून मृत्यू झालेल्या १३ रुग्णांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुष आहेत.

 

मृतांची नावं:

  1. उमा सुरेश कनगुटकर
  2. निलेश भोईर
  3. पुखराज वल्लभदास वैष्णव
  4. रजनी आर कडू
  5. नरेंद्र शंकर शिंदे
  6. जनार्दन मोरेश्वर म्हात्रे
  7. कुमार किशोर दोशी
  8. रमेश टी उपयान
  9. प्रविण शिवलाल गोडा
  10. अमेय राजेश राऊत
  11. रामा अण्णा म्हात्रे
  12. सुवर्णा एस पितळे
  13. सुप्रिया देशमुखे

Tags: hospital fireVirarरुग्णालय आगविरारविरार रुग्णालय
Previous Post

कोरोना संकटात पल्स ऑक्सिमीटर कसा वापराल?

Next Post

वसई विरार महानगरपालिकेत २०० जागांसाठी भरती

Next Post
virar

वसई विरार महानगरपालिकेत २०० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!