मुक्तपीठ टीम
रुग्णांना उपचारासाठी ठेवलेली रुग्णालयंच त्यांच्यासाठी मृत्यूचे सापळे ठरू लागली आहेत. भंडारा, मुंबई, नाशिक या तीन दुर्घटनांनंतर आता विरारच्या विजय वल्लभ या खासगी रुग्णालयात १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू अति दक्षता कक्षात होरपळून झाला आहे. तेथे असलेल्या एसीचा स्फोट झाल्यामुळे तेथे आग आगली, अशी माहिती रुग्णालयाचे डॉ. शाह यांनी दिली आहे.
नाशिकधील झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती घटल्यानंतर २४ रुग्णांचा मृत्यूची घटना ताजी असतानाच विरारच्या रुग्णालयात हे मृत्यूकांड घडलंय. तेथे विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथे विजय वल्लभहे खासगी रुग्णालय आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या एसीचा स्फोट झाला. त्यामुळे तेथे मध्यरात्रीनंतर आग लागली. यामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
नेमकं कसं घडलं मृत्यूकांड?
- विजय वल्लभ हे खासगी रुग्णालय आहे
- वसई-विरार मनपाने या रुग्णालयाला कोरोना रुग्णालयाचा दर्जा दिला आहे.
- चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली.
- पहाटे ३ च्या दरम्यान ही आग लागली.
- यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते.
- त्यापैकी फक्त चार रुग्ण आगीतून बाहेर येवू शकले, अन्य १३ रुग्ण आगीतच अडकले.
- आगीत अडकलेल्या १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.
- दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली.
- ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रुग्णालयातील भीषण आगीत होरपळून मृत्यू झालेल्या १३ रुग्णांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुष आहेत.
मृतांची नावं:
- उमा सुरेश कनगुटकर
- निलेश भोईर
- पुखराज वल्लभदास वैष्णव
- रजनी आर कडू
- नरेंद्र शंकर शिंदे
- जनार्दन मोरेश्वर म्हात्रे
- कुमार किशोर दोशी
- रमेश टी उपयान
- प्रविण शिवलाल गोडा
- अमेय राजेश राऊत
- रामा अण्णा म्हात्रे
- सुवर्णा एस पितळे
- सुप्रिया देशमुखे