मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली होती. ऑक्सिजनच्या अभावी अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. अशा परिस्थितीत ऑक्सिजनच्या बाबतीत हिंगोली जिल्हा स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार हिंगोली जिल्ह्याच्या पालक मंत्री व शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला होता. गेल्या तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर हिंगोली जिल्ह्यातील सिव्हिल रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा स्वतंत्र प्लाट कार्यान्वित केला. आरोग्य सेवा प्रणालीमध्ये आता ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव जाणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती या प्लॉट द्वारा होणार आहे.
राज्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजन क्षमता वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला या प्लाटमुळे खुप यश मिळाले आहे. शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत असताना शिक्षक व विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतांना राज्यातील सर्व सामान्य जनतेबरोबरच विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात वैद्यकीय सुविधा व उपचार प्राप्त होण्यासाठी शासन अनेक उपक्रम करत आहेत ऑक्सिजन निर्मिती हा एक त्यातील उपक्रम.
ऑक्सिजन निर्मितीच्या या प्रकल्पा मुळे दर तासाला १०५० लीटर क्षमतेच्या राज्यातील पहिल्या ऑक्सिजननिर्मिती स्वयंपूर्ण ठरवलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण आज जिल्हा रुग्णालयात केले. त्यामुळे रुग्णालयात चोवीस तासात साधारण २०० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन तयार होईल व त्यामुळे एकावेळेस १०० रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजन क्षमता वाढवण्यावर आमचा भर आहे. आणखी एक ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल. लोकार्पण कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेल्हे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंडारे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.