Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परंपरा जोपसण्यासाठी महिलांचा पुढाकार, माहेरवाशिणींच्या सन्मानासह खेळ, संगीताची धमाल!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Women's initiative

मुक्तपीठ टीम

काळ बदलतोय, नव्या सोयीसुविधा आणि मनोरंजनाची माध्यमंही पुढे येतायत. पण आपल्या परंपरेविषयी असलेली आपुलकी, जिव्हाळा हा वेगळाच. त्यातूनच पुण्यातील चिंचवडच्या वर्षा संजय भोईटेंनी यावर्षी विवाह झाला आहे अशा मुलींचा शोध घेतला. त्यांना घरी बोलवून परंपरा जोपासणारा खेळ, संगीताची लयलूट असणारा महोत्सव साजरा केला.
 Women's initiative

श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. पुण्यातही नागपंचमीचा सण काही वेगळ्या पद्धतीत साजरा करण्यात आला. चिंचवड येथील गुरुद्वाराजवळ राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा संजय भोईटे यांनी श्रावण महिन्यात नववधूंसाठी व इतर महिलांसाठी नागपंचमीचा संगीत महोत्सव साजरा केला. या वर्षी ज्या ज्या वधूंचा विवाह झाला आहे अशा मुलींचा शोध घेऊन त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना सदर नागपंचमी सणासाठी पाचारण केले.

 Women's initiative

माहेरवाशीणींचा नागपंचमीचा सण

  • स्वातंत्र्यदिन व नागपंचमीचे औचित्य साधून प्राधिकरणातील श्रावणी सखी मंच व बिजलीनगर येथील वर्षा भोईटे यांनी श्रावण महिन्यात माहेरवाशिणींना बोलावून त्यांचा यथोचित सन्मान केला.
  • यानिमित्त नृत्य, उखाणे, सासू व सुनांच्या फुगड्या आदी उपक्रम उत्साहात पार पडले.
  • दरवर्षी त्यांच्या या परंपरा जोपासणाऱ्या कार्यक्रमात सेलिब्रिटीही आवर्जून येतात.
  • एका वर्षी ‘ब्युटी ऑफ महाराष्ट्र’मध्ये द्वितीय क्रमांक मिळविलेल्या तबस्सुम मुल्ला यांनीही या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतला.
  • ‘श्रावण क्वीन’साठी निवड झालेली श्रावणी पोमनसाठीही त्यांनी प्रोत्साहन सोहळा आयोजित केला होता.
  • सुमारे १०० महिलांनी यात भाग घेतला.
  • या वेळी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.

महिला खास कार्यक्रमासाठी ठाणे, परेल, मुंबई, पूणे वरून आल्या

चांगली पंरपरा जपायची आणि वाढवायची…

  • पारंपारिक पद्धतीची सर्व साधने उदा. मुसळ, मातीची चूल, दगडी पाटा, दगडी जातं, वरंवंटा इत्यादीचा वापर त्या स्वतः करतात आणि इतरांनाही शिकवितात.
  • भुकेल्याला खाऊ घालणे यातच वर्षाताईंना खूप आनंद वाटतो. त्यांचा नेहमी प्रयत्न हाच राहिला आहे की, आपल्या भारताची संस्कृती पुढील पिढीला कळावी आणि त्यांनी त्या जोपासायला हव्या.
  • दिपावलीत त्या आवडीने सर्व फराळाचे पदार्थ करून आप्तेष्ट, नातेवाईक, मैत्रिणी- शेजारी, गोरगरीब या सर्वांना वाटतात.

 Women's initiative

वर्षा भोईटेंचा सण समाजसेवेचा!!

  • गेल्या २५ वर्षापासून वर्षा संजय भोईटे यांनी ही परंपरा जपलेली आहे.
  • हळदी-कुंकू, कोजागिरी पौर्णिमा, दसरा-दिवाळी आणि श्रावण मासातील स्त्रीयांशी संबंधित बहुतेक सण त्या स्वतः आपल्या राहत्या घरी साजरा करतात.
  • परिसरातीस नातेवाईकांमधील आणि परगावच्या स्त्रीयांना देखील त्या या कार्यक्रमात सामील करतात.
  • प्रसंगी पदरमोड करून त्या आपली ही आवड जोपासतात.
  • आपल्या आनंदात सर्वांना सामावून घेतात.

त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांचे पती संजय मानसिंगराव भोईटे, मुलगा विश्वराज, मुलगी राजेश्वरी आणि जाऊवाई जया भोईटे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष चटणे सर, कीर्ती बडवे, वर्षा मावरे, राजश्री जाधव, अनुराधा साळवी, नीना वरुडकर,मनीषा मुल्ला, छाया चोरे, मंगला पाटील,पूजा जाधव,शारदा देशमुख,मंगल मोकाशी यांचा मोलाचा वाटा आहे.

पाहा व्हिडीओ :


Tags: Cultivating traditionsgood newsmuktpeethMusic sportsSports for womenWomen's initiativeघडलं-बिघडलंचांगली बातमीपरंपरा जोपसणेमहिलांचा पुढाकारमाहेरवाशिणींसाठी खेळमुक्तपीठवर्षा भोईंटेसंगीत खेळ
Previous Post

राज्यात १९३२ नवे रुग्ण, २१८७ रुग्ण बरे! मुंबई ४३४, नाशिक ७, नागपूर ५८ नवे रुग्ण !!

Next Post

देशांतर्गत जलमार्ग प्रोत्साहन योजनेत निवडलेल्या २६ जलमार्गांमध्ये महाराष्ट्रातील चार जलमार्ग

Next Post
Maharashtra Waterways

देशांतर्गत जलमार्ग प्रोत्साहन योजनेत निवडलेल्या २६ जलमार्गांमध्ये महाराष्ट्रातील चार जलमार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!