मुक्तपीठ टीम
काळ बदलतोय, नव्या सोयीसुविधा आणि मनोरंजनाची माध्यमंही पुढे येतायत. पण आपल्या परंपरेविषयी असलेली आपुलकी, जिव्हाळा हा वेगळाच. त्यातूनच पुण्यातील चिंचवडच्या वर्षा संजय भोईटेंनी यावर्षी विवाह झाला आहे अशा मुलींचा शोध घेतला. त्यांना घरी बोलवून परंपरा जोपासणारा खेळ, संगीताची लयलूट असणारा महोत्सव साजरा केला.
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. पुण्यातही नागपंचमीचा सण काही वेगळ्या पद्धतीत साजरा करण्यात आला. चिंचवड येथील गुरुद्वाराजवळ राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा संजय भोईटे यांनी श्रावण महिन्यात नववधूंसाठी व इतर महिलांसाठी नागपंचमीचा संगीत महोत्सव साजरा केला. या वर्षी ज्या ज्या वधूंचा विवाह झाला आहे अशा मुलींचा शोध घेऊन त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना सदर नागपंचमी सणासाठी पाचारण केले.
माहेरवाशीणींचा नागपंचमीचा सण
- स्वातंत्र्यदिन व नागपंचमीचे औचित्य साधून प्राधिकरणातील श्रावणी सखी मंच व बिजलीनगर येथील वर्षा भोईटे यांनी श्रावण महिन्यात माहेरवाशिणींना बोलावून त्यांचा यथोचित सन्मान केला.
- यानिमित्त नृत्य, उखाणे, सासू व सुनांच्या फुगड्या आदी उपक्रम उत्साहात पार पडले.
- दरवर्षी त्यांच्या या परंपरा जोपासणाऱ्या कार्यक्रमात सेलिब्रिटीही आवर्जून येतात.
- एका वर्षी ‘ब्युटी ऑफ महाराष्ट्र’मध्ये द्वितीय क्रमांक मिळविलेल्या तबस्सुम मुल्ला यांनीही या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतला.
- ‘श्रावण क्वीन’साठी निवड झालेली श्रावणी पोमनसाठीही त्यांनी प्रोत्साहन सोहळा आयोजित केला होता.
- सुमारे १०० महिलांनी यात भाग घेतला.
- या वेळी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
महिला खास कार्यक्रमासाठी ठाणे, परेल, मुंबई, पूणे वरून आल्या
चांगली पंरपरा जपायची आणि वाढवायची…
- पारंपारिक पद्धतीची सर्व साधने उदा. मुसळ, मातीची चूल, दगडी पाटा, दगडी जातं, वरंवंटा इत्यादीचा वापर त्या स्वतः करतात आणि इतरांनाही शिकवितात.
- भुकेल्याला खाऊ घालणे यातच वर्षाताईंना खूप आनंद वाटतो. त्यांचा नेहमी प्रयत्न हाच राहिला आहे की, आपल्या भारताची संस्कृती पुढील पिढीला कळावी आणि त्यांनी त्या जोपासायला हव्या.
- दिपावलीत त्या आवडीने सर्व फराळाचे पदार्थ करून आप्तेष्ट, नातेवाईक, मैत्रिणी- शेजारी, गोरगरीब या सर्वांना वाटतात.
वर्षा भोईटेंचा सण समाजसेवेचा!!
- गेल्या २५ वर्षापासून वर्षा संजय भोईटे यांनी ही परंपरा जपलेली आहे.
- हळदी-कुंकू, कोजागिरी पौर्णिमा, दसरा-दिवाळी आणि श्रावण मासातील स्त्रीयांशी संबंधित बहुतेक सण त्या स्वतः आपल्या राहत्या घरी साजरा करतात.
- परिसरातीस नातेवाईकांमधील आणि परगावच्या स्त्रीयांना देखील त्या या कार्यक्रमात सामील करतात.
- प्रसंगी पदरमोड करून त्या आपली ही आवड जोपासतात.
- आपल्या आनंदात सर्वांना सामावून घेतात.
त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांचे पती संजय मानसिंगराव भोईटे, मुलगा विश्वराज, मुलगी राजेश्वरी आणि जाऊवाई जया भोईटे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष चटणे सर, कीर्ती बडवे, वर्षा मावरे, राजश्री जाधव, अनुराधा साळवी, नीना वरुडकर,मनीषा मुल्ला, छाया चोरे, मंगला पाटील,पूजा जाधव,शारदा देशमुख,मंगल मोकाशी यांचा मोलाचा वाटा आहे.