Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

एकीकडे व्हॅक्सिन डिप्लोमसी, दुसरीकडे भारतीय उद्योगपतीची कच्च्या मालासाठी अमेरिकन अध्यक्षांकडे विनवणी!

April 17, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Adar Poonawala Joe biden-1

मुक्तपीठ टीम

 

कोरोना लसीसाठी आवश्यक कच्च्या मालावर लादण्यात आलेले निर्बंध उठवण्यासाठी सीरम इन्सिस्ट्युटचे अदार पुनावाला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना हात जोडून विनंती केली आहे. अमेरिका आणि युरोपने कोरोना लसीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या त्या देशांमधून निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतातील कोरोना लस उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक देशांना कोरोना लस पुरवत व्हॅक्सिन डिप्लोमसीचा दावा केला जात असतानाच भारतीय उद्योगपतीला कोरोना लसीच्याच कच्च्या मालासाठी दुसऱ्या देशाच्या प्रमुखाकडे हात जोडावे लागणे, हे विरोधाभासी मानले जात आहे. पुनावालांच्या ट्विटनंतर तशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

भारतात कोरोना लसीकरण सुरू असताना देशभरातील अनेक राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार समोर येत होती. दरम्यान सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी लसींच्या निर्मितीठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती दिली होती. हा पुरवठा अमेरिका आणि युरोपने थांबवला असल्याचे त्यांनी सांगितले होते.

 

कच्च्या मालाचा पुरवठा अद्यापही होत नसल्यामुळे आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून अदर पुनावाला यांनी विनंती केली आहे. एकीकडे एक भारतीय उद्योगपती असे प्रयत्न करत असताना सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत, असा प्रश्न निर्माण होत आहे. भारताने मोठ्या प्रमाणावर जगातील अनेक देशांना कोरोना लस पुरवत व्हॅक्सिन डिप्लोमसीचा दावा केला होता. आता मात्र लसींसाठीचा कच्चा माल मिळवण्यासाठी एका भारतीय उद्योगपतीला दुसऱ्या देशांच्या प्रमुखांपुढे हात जोडावे लागत असल्याने ट्विटरकरांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काहींनी भारताने गेल्यावर्षी केलेला हायड्रोक्लोरोक्विन गोळ्यांचा पुरवठा अमेरिकेने विसरू नये, असेही सुनावले आहे. मात्र, एकंदरीत सूर एक भारतीय उद्योगपती अमेरिकेच्या अध्यक्षांपुढे विनवणी करत असताना भारत सरकार काय करत आहे, असे विचारणाराच आहे.

 

अदार पूनावाला यांचं ट्विट

“आदरणीय जो बायडेन…जर आपण खरंच कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत एकत्र आहोत तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी आपणांस नम्रपणे विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा. यामुळे लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. तुमच्या प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती आहे”. (पुढे जोडलेल्या हातांचा इमोजी)

 

Respected @POTUS, if we are to truly unite in beating this virus, on behalf of the vaccine industry outside the U.S., I humbly request you to lift the embargo of raw material exports out of the U.S. so that vaccine production can ramp up. Your administration has the details. 🙏🙏

— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 16, 2021

 

कोरोना लसीच्या कच्च्या मालासाठी सीरम अमेरिकेवर अवलंबून!

 

  • भारतात कोरोना लसीच्या उत्पादनासाठी सीरम इंस्टिट्युट अमेरिकेतून कच्चा मालाची आयात करते.
  • सीरम आयात करत असलेल्या वस्तूंमध्ये फिल्टर, बॅग, काही मीडिया सोल्यूशन्स इत्यादींचा समावेश आहे.
  • आता अचानक नवीन पुरवठादार शोधण्यास वेळ लागेल.
  • सीरम नवीन पुरवठादार शोधत आहे आणि ६ महिन्यांनंतर अमेरिकेवर अवलंबून राहणार नाही.
  • परंतु आता तातडीची गरज भागवण्यासाठी सीरमला कच्च्या मालाची आवश्यकता आहे.

ट्विटरकरांच्याही प्रतिक्रिया:

1

 

Businessman talking directly to Biden? What is government there for?@ShashiTharoor

— Anu Mittal (@stylistanu) April 16, 2021

2

 

Businessman talking directly to Biden? What is government there for?@ShashiTharoor

— Anu Mittal (@stylistanu) April 16, 2021

3

 

@adarpoonawalla : Sir just remind him what @narendramodi did last year when they were badly requested HCQ. United we stand is what we learned from childhood and Indian pharma like @siruminstitute is the living example. Just keep on doing great work. Proud Indian

— PratikThaker (@PratikTweetsNow) April 16, 2021


Tags: adar poonawalacoronaserum-instituteअदार पुनावालाकोरोनासीरम
Previous Post

नवं संशोधन, नवं टेन्शन! हवेतूनही कोरोना विषाणू पसरत असल्याचा दावा

Next Post

कोरोना संसर्गात देशात नाशिक का टॉपर?

Next Post
nashik

कोरोना संसर्गात देशात नाशिक का टॉपर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!