मुक्तपीठ टीम
राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबई मनपा क्षेत्रातील १० शासकीय लसीकरण केंद्रावर या नागरिकांना लस दिली जाईल. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत लसीकरण होणार आहे. आजपासून या १० लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी २०० डोसेस उपलब्ध असतील. याशिवाय ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर करता येणार-
- शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे.
- ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन अॅपमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.
- विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले आहे.
- संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
मुंबईत इथे होणार लसीकरण-
- प्रियदर्शनी पार्क- वाळकेश्वर
- बीएमसी मुरली देवरा नेत्र रुग्णालय-कामठीपुरा
- अकवर्थ लेपरसी-वडाळा
- सेठ आयुर्वेदिक रुग्णलाय- सायन
- केबी भाभा रुग्णालय- बांद्रा
- एम डब्ल्यु देसाई रुग्णालय- मालाड
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय – बोरिवली
- देवनार मॅटर्निटी होम- देवनार
- जॉली जिमखाना-विद्याविहार
- वि.दा. सावरकर रुग्णालय- मुलुंड