मुक्तपीठ टीम
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात स्टेनोग्राफर असिस्टंट सब इंस्पेक्टर या पदावर १२२ जागा, मिनिस्टीरियल हेड कॉन्स्टेबल या पदावर ४१८ जागा अशा एकूण ५४० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) 10वी उत्तीर्ण २) कौशल्य चाचणी नियम- १) डिक्टेशन- १० मिनिटे, संगणकावर ५० मिनिटे इंग्रजी किंवा ६५ मिनिटे हिंदी टायपिंग
- पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) संगणकावर इंग्रजी टायपिंग किंवा हिंदी टाइपिंग येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
शारीरिक पात्रता
- जनरल/ ओबीसी/ एससी वर्गातील पुरूषांची उंची १६५ सें.मी तर, महिलांची उंची १५५ सें.मी असावी. पुरूषांची छाती ७७ सें.मी आणि फुगवून ५ सें.मी. जास्त असावी.
- एसटी वर्गातील पुरूषांची उंची १६२.५ सें.मी तर, महिलांची उंची १५० सें.मी असावी. पुरूषांची छाती ७६ सें.मी आणि फुगवून ५ सें.मी. जास्त असावी.
अधिक माहितीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.cisf.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1ZTSxAmws0fgoTAS5vfX-LoRF4a8HT8FV/view