मुक्तपीठ टीम
उत्तराखंडला देवभूमी म्हणूनही ओळखले जाते, कारण अनेक प्राचीन धार्मिक स्थळांसह, हे राज्य हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानल्या जाणार्या गंगा आणि यमुना या देशातील सर्वात मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. उत्तराखंडच्या उत्तरेला तिबेट आणि पूर्वेला नेपाळ आहे. याच्या पश्चिमेला हिमाचल प्रदेश आणि दक्षिणेला उत्तर प्रदेश आहे. इथल्या दऱ्या,डोंगर लोकांना खूप आवडतात. उत्तराखंडमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक सुट्टीसाठी येतात.
उत्तराखंडमधील सुंदर नैसर्गिक पयर्टन स्थळे…
ओली…
- गढवाल, उत्तराखंडमधील ओली हे एक सुंदर ठिकाण आहे.
- उत्तरांचलमधील ओली हे नैसर्गिक सौंदर्य तसेच स्कीइंगसाठी लोकप्रिय आहे.
- या ठिकाणी देवदाराची अनेक झाडे आहेत.
- येथे भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे हिवाळा.
चक्रता…
- चक्रता हे देखील खूप सुंदर ठिकाण आहे.
- डिसेंबरच्या अखेरीपासून ते जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हा येथे जाऊ शकता.
- हिमवर्षावासाठी हे ठिकाण सर्वात सुंदर आहे.
- इथून मन्सूरीला सहज जाता येते.
हिल्सची राणी मसुरी!
- मसुरीमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.
- मसुरीला या हिल स्टेशनला भेट देणे ही पर्यटकांची पहिली पसंती असते.
- येथे कांप्टी फॉल्स, भट्टा फॉल्स, मॉल रोड, जॉर्ज एव्हरेस्ट ही अतिशय अनुकूल ठिकाणे आहेत.
- दून ते मसुरी हे अंतर फक्त ३५ किमी आहे.
ऋषिकेश
- ऋषिकेश हे उत्तराखंडमधील हरिद्वार जवळ वसलेले डेहराडून जिल्ह्यातील एक लहान शहर आहे.
- ऋषिकेशला प्राचीन मंदिरे, लोकप्रिय कॅफे आणि “जगातील योग राजधानी” म्हणून ओळखले जाते.
- ऋषिकेश हे एक तीर्थक्षेत्र आहे आणि हिंदूंसाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे.
- व्हाईटवॉटर राफ्टिंग, बंजी जंपिंग, माउंटन बाइकिंग आणि कॅम्पिंगसाठी तितकेच लोकप्रिय आहे.
नैनिताल
- नैनिताल हे उत्तराखंडमधील कुमाऊं पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेले एक आकर्षक हिल स्टेशन आहे.
- नैनितालमध्ये वर्षभर आल्हाददायक वातावरण असते.
- नैनितालजवळ पंगोट, रानीखेत, अल्मोरा सारखी काही छोटी डोंगरी शहरे आहेत.
- नैनितालमध्ये लहान ट्रेकिंग ट्रेल्स देखील आहेत.
जिम कॉर्बेट
- जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात हिमालयाच्या पायथ्याशी असलेले सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे.
- वन्यजीव सफारीसाठी प्रसिद्ध, जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये नदीकाठी अनेक रिसॉर्ट्स आहेत.
- दुर्मिळ आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या ६५० हून अधिक प्रजातींचे घर, पक्षी निरीक्षकांसाठी हे आश्रयस्थान आहे.
- राष्ट्रीय उद्यानात एका दिवसात केवळ १८० वाहनांना प्रवेश दिला जातो.
- जिम कॉर्बेट नॅशनल पार्क पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबर पर्यंत बंद असते.
राणीखेत
- उत्तराखंडमधील सर्वात लोकप्रिय आकर्षणांपैकी एक म्हणजे रानीखेत.
- उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यात राणीखेत स्थित आहे.