Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वर्षातून एकदाच फक्त रक्षाबंधन सणाला उघडणारं जगातील एकमेव मंदिर…जाणून घ्यावी अशी एक वेगळीच परंपरा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
uttarakhand bansi narayan temple (1)

मुक्तपीठ टीम

आज राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन…यादिवशी बहिणी भावाला ओवाळून राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. तर भाऊराया देखील बहिणीला आयुष्यभर संरक्षणाचे वचन देतात. यामुळे रक्षाबंधनच्या सणाला विशेष महत्त्व असते. या दिवशी देवी लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली होती. उत्तराखंडमधील चमोली येथे असे एक मंदिर आहे, जे केवळ रक्षाबंधनाच्या निमित्ताने भक्तांसाठी उघडले जाते. हे मंदिर भगवान बंसी नारायणाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात वर्षातून फक्त एक दिवस पूजा केली जाते. उत्तराखंडमध्ये या मंदिरासंबंधित काही रंजक माहितीही जाणून घेऊया.

uttarakhand bansi narayan temple (2)

बंसी नारायण मंदिराचं वेगळंपण…

  • या मंदिराचे नाव बंसी नारायण मंदिर असून ते उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील उरगम खोऱ्यात आहे.
  • रक्षाबंधनाला या मंदिराचे दरवाजे वर्षातून एकदाच उघडतात.
  • रक्षाबंधनाच्या दिवशी आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या महिला भगवान बंशी नारायण यांना राखी बांधतात.
  • यानंतरच भावांना राखी बांधली जाते आणि सूर्यास्तानंतर मंदिराचे दरवाजे पुन्हा वर्षभरासाठी बंद केले जातात.
  • येथे भगवान श्रीकृष्ण आणि कल्याणकारी शिवाच्या मूर्ती आहेत.
  • या मंदिरापर्यंत जाण्यासाठी उरगम खोऱ्यातील लोकांना सात किलोमीटर पायी चालत जावे लागते.
  • मंदिराच्या अंगणात श्रीगणेशाच्या आणि वनदेवतांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत.

uttarakhand bansi narayan temple (3)

रक्षाबंधनाची पौराणिक श्रद्धा

  • या मंदिराशी संबंधित पौराणिक कथेनुसार, देवऋषी नारद येथे वर्षातील ३६४ दिवस भगवान विष्णूची पूजा करतात, त्यामुळे या मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी बंद असतात.
  • या मंदिरात केवळ एक दिवस पूजा करण्याचा अधिकार मानवाला मिळतो, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी या मंदिराचे दरवाजे उघडतात.
  • एका पौराणिक कथेनुसार, राजा बळीने भगवान विष्णूंना आपला द्वारपाल बनण्याची विनंती केली होती.
  • राजा बळीची विनंती मान्य करून श्रीहरी पाताललोकात गेले.
  • अनेक दिवस भगवान विष्णू न दिसल्याने माता लक्ष्मी खूप चिंतित झाली आणि त्यांनी नारदजींना विष्णूजीबद्दल विचारले.
  • आईने विचारल्यावर नारदांनी सांगितले की ते अधोलोकातील राजा बळीचा द्वारपाल आहेत
  • त्यावेळी माता लक्ष्मी भगवानांना मुक्त करण्यासाठी अधोलोकात पोहोचली आणि राजा बळीला रक्षासूत्राचे वचन घेऊन भगवान विष्णूंना मुक्त केले.
  • त्यानंतर भगवान विष्णू अधोलोकातून परतले, तेव्हापासून देवाला राखी बांधण्याची परंपरा सुरू आहे, असे मानले जाते.

uttarakhand bansi narayan temple (4)

मंदिरातील एका दिवसाच्या पुजेची कथा…

  • जेव्हा माता लक्ष्मीने त्यांना परत आणण्याचा मार्ग विचारला तेव्हा नारद मुनींनी सांगितले की श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला अधोलोकात जाऊन राजा बळीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे.
  • रक्षासूत्र बांधल्यानंतर राजा बळीला श्रीहरी परत करण्यास सांगा.
  • असे म्हणतात की माता लक्ष्मीला अधोलोकाचा मार्ग माहित नव्हता, म्हणून श्रावण पौर्णिमेच्या दिवशी नारद मुनी तिच्यासोबत अधोलोकात गेले.
  • त्यांच्या अनुपस्थितीत एके दिवशी कालगोठ गावच्या पुजार्‍याने भगवान बंसीनारायणांची पूजा केली.
  • तेव्हापासून या मंदिराचे दरवाजे फक्त रक्षाबंधनाच्या एका दिवसासाठी सामान्य भाविकांसाठी उघडले जातात आणि लोक रक्षाबंधनाला त्यांची पूजा करतात असे म्हणतात.

uttarakhand bansi narayan temple (5)

कशी केली जाते पूजा?

  • रक्षाबंधनाच्या दिवशी कालगोठ गावातील प्रत्येक घरातून भगवान नारायणासाठी लोणी येते.
  • त्या लोण्यापासून प्रसाद तयार केला जातो.
  • या मंदिरात श्रावण पौर्णिमेला भगवान नारायण यांचा श्रृंगारही केला जातो.
  • त्यानंतर गावातील लोक भगवान नारायणांना रक्षासूत्र बांधतात.
  • मंदिरात पुजारी असतात.

uttarakhand bansi narayan temple (6)

बंसीनारायण मंदिरात दर्शनाला जायचंय? हा आहे मार्ग…

  • हे मंदिर फक्त रक्षाबंधन सणालाच दर्शनासाठी उघडं असतं, हे लक्षात ठेऊनच प्रवासाचं नियोजन करा.
  • उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील उरगम खोऱ्यात बंसी नारायण मंदिर आहे.
  • उत्तराखंडमधील डेहराडूनपासून २९३ किमी अंतरावरील जोशीमठला जावे लागते.
  • जोशीमठपासून २२ किमी अंतरावर असलेल्या हेलांगकडे पहिला टप्पा.
  • त्यानंतर हेलांगपासून १५ किमी अंतरावर असलेल्या देवग्रामला दुसरा टप्पा.
  • त्यानंतर १२ ते १५ किमी पायी चालावं लागतं.
  • बंसी नारायण मंदिराचा ट्रेक देवग्रामपासून सुरू होतो.

Tags: BanshiNarayan TempleRakshabandhanUttarakhandउत्तराखंडबंशीनारायण मंदिररक्षाबंधन
Previous Post

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे ३ निर्णय! जाणून घ्या विस्तारानं…

Next Post

राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘जीवन गाणे गातच जावे’ कार्यक्रमाचे आयोजन

Next Post
'Jevan gane Gatcha Jave' program organised in all District Central Jails

राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 'जीवन गाणे गातच जावे’ कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!