मुक्तपीठ टीम
भविष्यासाठी आर्थिक बचत करणे हे सध्याच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी लहान बचत योजनांद्वारे मोठी रक्कम जमा केली जाऊ शकते. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत ज्यात भरपूर व्याज मिळतो. या योजनांमध्ये पैसे जमा केल्याने रक्कम झपाट्याने वाढते आणि अनेक योजनांद्वारे करात सूटही मिळते. पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत ज्या बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा देतात.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना
- पोस्ट ऑफिस लहान ठेवीदारांसाठी काही सर्वोत्तम व्याजदर ऑफर करते जे दीर्घ कालावधीसाठी हमी परतावा शोधत आहेत.
- यामध्ये पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही योजना आहे.
- या योजनेत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळते.
- गुंतवणूकदार पीपीएफ खात्यात वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
- ठेवी मासिक किंवा त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर केल्या जाऊ शकतात. गुंतवणूकदार पीपीएफ खात्यात १५ वर्षे सतत गुंतवणूक करू शकतात.
पोस्ट ऑफिस एनएससी योजना
- पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये एनएससी ही देखील एक मोठी परतावा योजना आहे.
- हे कलम ८०सी अंतर्गत कर लाभांसह हमी परतावा देखील देते.
- अनेक तज्ञ या योजनेची शिफारस जोखीम-विरोधक गुंतवणूकदारांना करतात.
- नॅशनल सिक्युरिटी स्कीम एक निश्चित रिटर्न ऑफर करताना प्रिन्सिपल सुरक्षित ठेवते.
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत ठेवी ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकार ६.८ टक्के दराने व्याज देते.
पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजना
- बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना ही एक उत्तम योजना आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेत इतर योजनांपेक्षा जास्त व्याज मिळते. यामध्ये कमी पैसे गुंतवल्यास तुम्हाला मोठी रक्कम मिळते.
- जर तुम्ही इतर लहान बचत योजनांशी तुलना केली तर सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेल्या रकमेवर प्राप्तिकरातही सूट आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जात नाही.
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यावर ७.६ टक्के दराने व्याज दिले जात आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची योजना
- सुरक्षित गुंतवणूक शोधत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना अतिशय फायदेशीर आहे.
- त्याचा व्याजदर बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा खूप जास्त आहे.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेवर वार्षिक ७.४ टक्के व्याजदर आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
किसान विकास पत्र योजना
- किसान विकास पत्र योजना ही एक लोकप्रिय पोस्ट ऑफिस योजना आहे.
- यामध्ये सरकार दरवर्षी ६.९ टक्के व्याज देत आहे. व्याजदरानुसार, ते १० वर्षे आणि ४ महिन्यांत तुमची ठेव रक्कम दुप्पट करू शकते.
- आज १ लाख रुपये केव्हीपी ठेव सुरू केल्यास, पुढील १२ वर्षात ती २ लाख रुपये होईल.