Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘महाराष्ट्र केसरी’चा थरार वर्षअखेरीस, ९०० कुस्तीगीर होणार सहभागी!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Maharashtra Kesari

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असल्याचा आनंद असून, कोथरूडमध्ये ही स्पर्धा भव्य स्वरूपात करण्याचा मानस आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै. तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे आणि पदाधिकारी, कुस्तीगीर आदी उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ ही स्पर्धा सुरु झाली आणि आज मोठ्या शिखरावर पोहोचली. त्याच आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे या स्पर्धेची जबाबदारी आली, ही निखळ समाधान देणारी बाब आहे. ज्या मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा, उजाळा देणारी ही स्पर्धा ठरेल. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय सिंग यांच्याकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचे पत्र स्विकारले आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वर्षाअखेरीस या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, तसेच कुस्तीप्रेमींना निमंत्रित करण्यात येणार आहे.”

“सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून, राज्यभरातील मल्ल एकमेकांशी दोन हात जाणार आहेत. ३३ जिल्ह्यातील आणि ११ महापालिकामधील ४५ तालीम संघातील ९०० मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह नामांकित ४० मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे,” असे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.

अशोक मोहोळ म्हणाले, “मामासाहेब मोहोळ यांच्या गावात मोहोळ कुटुंबीय ही स्पर्धा भरवत आहेत, ही आनंदाची बाब आह. तसेच गेली ३८ वर्षे ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा देण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे. जो ‘महाराष्ट्र केसरी’ ठरतो, त्याच्या हातात मानाची गदा देताना समाधान वाटते.”

विलास कथुरे म्हणाले, “विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होतील. ९०० कुस्तीगीर, ९० व्यवस्थापक, ९० मार्गदर्शक, १२५ तांत्रिक अधिकारी, ९० पदाधिकारी सहभागी होणार आहेत.”

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsKumbh Mela of wrestlingMaharashtraMaharashtra Kesarimuktpeethwrestlers to participateकुस्तीगीर होणार सहभागीकुस्तीचा कुंभमेळाचांगली बातमीमहाराष्ट्रमहाराष्ट्र केसरीमुक्तपीठ
Previous Post

अशक्य नसतंच काही! एका तपाच्या संघर्षानंतर गोपिका बनली केरळची पहिली आदिवासी हवाईसुंदरी!

Next Post

पोस्ट ऑफिस योजनेसारख्या लहान बचत योजनांचा लाभ घ्या, बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळवा

Next Post
Post Office Saving Schemes

पोस्ट ऑफिस योजनेसारख्या लहान बचत योजनांचा लाभ घ्या, बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!