मुक्तपीठ टीम
अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी आरोपींना समन्स बजावण्यासाठी पारंपरिक मार्गांव्यतिरिक्त नव्या मार्गांवर विचार केला. त्यांनी मोबाईलवरील मॅसेज किंवा सोशल मीडियाद्वारे संबंधित आरोपींना समन्स पाठविण्याचं नवं पाऊल उचलले आहे. या नव्या मार्गामुळे जिल्ह्यातील गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे.
पोलिसांच्या नव्या पावलामुळे २०२०च्या डिसेंबर महिन्यात अमरावतीत गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ९०.४%वर पोहचले आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ झाले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. राज्यातील दहा पोलीस आयुक्तालयांमध्ये अमरावती पोलीस आयुक्तालय पहिल्या क्रमाकांवर आले आहे.
आयुक्तालयांमध्ये कोण पुढे?
अमरावती ९०.४%
नवी मुंबई ९०.२६%
ग्रामीण भागात कोण पुढे?
वर्धा- ९७.५६%
नंदुरबार-९७.३७%
चंद्रपुर- ९१.९३%
नाशिक ग्रामीण- ९४.७७%
ठाणे-९३.७५%
डिसेंबर महिन्यात राज्यात सुमारे ७,५६५ प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी सुमारे ५,४४८ प्रकरणांमध्ये दोषसिद्धी झाली. मात्र, ते प्रमाण नोव्हेंबर २०२० मधील कामगिरीच्या तुलनेत ७% कमी होते. या पार्श्वभूमीवर अमरावती आयुक्तालयाची कामगिरी अधिकच उठून दिसत आहे.
पाहा व्हिडीओ