Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षणाची मनी इच्छा जबरी, मंत्री महोदयांनी अखेर मिळवली पदवी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Eknath Shinde

मुक्तपीठ टीम

पदवी पाहिजे मला…मनात ठाण निर्धार. त्याला अभ्यासाच्या कृतीची जोड. त्यातूनच अखेर मिळवली पदवी. खरंतर राजकारण हा फुलटाइम जॉब. ओव्हटाइम तर ठरलेलाच. तरीही मंत्रिपदाच्या व्यापातून, व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएची परीक्षा दिली आणि पदवीही मिळवली.

 

परिस्थितीमुळे एकनाथ संभाजी शिंदे यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पण मनात शिक्षणाची जिद्द आणि तळमळ कायम होती. त्यामुळे संधी मिळताच त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात नाव नोंदवले. सलग तीन वर्षे चिकाटीने अभ्यास करून गेल्या वर्षी ते बीए परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. मराठी आणि राजकारण (प्रत्येकी तीन पेपर) असे दोन विषय घेऊन एकनाथ शिंदे अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसले होते. ७७.२५ टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले होते.

या परीक्षेचा पदवीदान समारंभही करोनामुळे व्हर्च्युअल पद्धतीनेच झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन आणि कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. शिंदे यांच्यासह गोंदिया येथील शैलेश चुटे, मुंबईतील सईद रुखसार फातेमा सईद अहमद, निकेश कुऱ्हाडे या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात गौरवण्यात आले. या सोहळ्यात २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदविका, पदव्युत्तर पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, एम फिल, पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: एकनाथ संभाजी शिंदेकुलसचिव डॉ. दिनेश भोंडेमुंबई
Previous Post

#अध्यात्म दान…देणे सुरू झाले की येणे सुरू होते!

Next Post

आमदारांची जिद्द मोठी शिकण्याची, साठीतही दिली परिक्षा बीएची

Next Post
mani

आमदारांची जिद्द मोठी शिकण्याची, साठीतही दिली परिक्षा बीएची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!