मुक्तपीठ टीम
आयफोन यूजर्ससाठी एक महत्त्वाची सूचना सध्या जारी करण्यात आली आहे. त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशात डिजिटलायझेशन जितके सोयीस्कर झाले आहे तितकेच सायबर गुन्हेगारीच्या घटनाही समोर येत आहेत. नुकतेच, सुरक्षा तज्ञांनी आयफोन यूजर्सना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. जर कोणाकडे अॅपलचे कोणतेही डिव्हाईस असेल तर ते अपडेट करावे. असं न केल्यास फोन हॅक होण्याचा धोका आहे.
आयफोन, आयपॅड आणि मॅकसाठी सुरक्षेसंबंधित काही त्रुटी आहेत ज्यामुळे हॅकर्संना या उपकरणांवर पूर्ण नियंत्रण ठेवता येऊ शकते. यासाठी अॅपल वर्षातून अनेक वेळा सुरक्षा अपडेट्सने जारी करते.
अपडेट करण्याची सोपी पद्धत…
१. अॅपल डिव्हाइसला ऑपरेटिंग सिस्टमवर अपडेट करण्यासाठी, प्रथम सेटिंग्जवर जा.
२. त्यानंतर General वर क्लिक करून सॉफ्टवेअर अपडेट वर क्लिक करा.
३. मॅक अपडेट करण्यासाठी system Preferences वर जाऊन Software Update करता येईल.
अॅपलचे सर्व डिव्हाइस अपडेट करण्या मागील नेमके कारण कोणते?
१. हे अपडेट वेळ घेणारे आणि हळू असू शकतात.
२. परंतु, डिव्हाइसवर कोड चालवणाऱ्या हॅकर्सपासून अॅपलचे डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यासाठी ते आवश्यक आहेत.
३. अपडेट न केल्यास, हॅकर्स अॅपल डिव्हाइसेसचे संपूर्ण नियंत्रण काढून घेऊ शकते, ज्यामुळे गुन्हेगार त्यांच्या नावावर कोणतेही सॉफ्टवेअर चालवू शकते.
४. ही जोखीम टाळायची असल्यास अॅपल फोन, कॉम्प्युटर किंवा टॅबलेट ताबडतोब अपडेट करा.
अॅपलच्या कोणत्या उपकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे?
अॅपलच्या प्रभावित उपकरणांमध्ये आयफोन ६एस आणि आयपॅडचे अनेक मॉडेल, आयपॅड प्रो माईल, आयपॅड एअर२ यांचा समावेश आहे. काही पॉड मॉडेल्स देखील यामुळे प्रभावित होतात.