मुक्तपीठ टीम
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जमिन घोटाळ्याच्या आरोपानंतर आता राय यांच्याविरूद्ध अयोध्याच्या एका पुरातन मंदिराच्या विक्रीप्रकरणी दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाने नोटीसही बजावली आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष दुबे यांनी यांनी फकीरे राम मंदिराच्या खरेदी-विक्रीसंदर्भात हा दावा दाखल केला आहे.
फिर्यादीच्या वतीने बाजू मांडण्यासाठी अधिवक्ता रणजितलाल वर्मा आणि ध्रुवजित वर्मा यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश संजीव त्रिपाठी यांनी प्रतिवादी पक्षाचे चंपत राय, मंदिराचे मूळ विश्वस्त कृपाशंकर दास आणि रामकिशोर सिंग यांना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी ६ ऑगस्ट रोजी होईल.
पुरातन मंदिर मालमत्ता विक्रीचा वाद काय?
- बांधकाम चालू असलेल्या श्री राम जन्मभूमी मंदिरासमोरील राम गुलेला मंदिरास पौराणिक महत्त्व आहे.
- त्या मंदिराचे महंत राजकिशोरशरणने आपल्या हयातीत मंदिराचा ट्रस्ट बनवला होता.
- ते मंदिर आणि त्याची मालमत्ता ट्रस्टच्या नियमांनुसार विकली जाऊ शकत नाही आणि त्याची देखभाल व व्यवस्था ट्रस्टच्या नियमांनुसार केली जाईल.
- महंतांच्या निधनानंतर रघुवरशरण यांनी स्वत: ला महंत घोषित केले आणि ट्रस्टच्या व्यवस्थेविरूद्ध त्याचे नाव शासकीय नोंदीत दाखल झाले.
- हा आदेश २६ मार्च रोजी जारी करण्यात आला होता आणि दुसर्या दिवशी २७ मार्च रोजी मंदिर आणि मालमत्तेला श्री रामजन्म तीर्थ ट्रस्टच्या बाजूने केले गेले ज्याला या व्यवहाराला कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता.
अयोध्या जमीन खरेदी वादाप्रकरणी महंत आक्रमक, फसवणूक करणाऱ्यांच्या अटकेची मागणी