Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोलिसांचं मन मोठं! डिलिव्हरी बॉयला उन्हात सायकल चालवताना पाहून मोटर सायकल भेट!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
madhya Pradesh Police

मुक्तपीठ टीम

मे महिना सुरू झाला आहे. अतिशय कडाक्याचं उन पडत आहे. बाहेर पडताना जीव अगदी कासावीस होतो. एप्रिलपासून उन्हाचा कडाका इतका वाढला आहे की, घराबाहेर पडण्यापूर्वीच विचार करावा लागतो. अशा स्थितीत रस्त्याच्या कडेला फळे, भाजीपाला विकणारे आणि फेरीवाल्यांसाठी हा महिना अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही. याशिवाय डिलिव्हरी बॉईजसुद्धा एसी रूममध्ये बसलेल्या लोकांपर्यंत कडक उन्हात सायकल आणि बाईकवरून जेवण पोहोचवत आहेत. मध्य प्रदेशात अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात पोलिसांची माणुसकी दिसली आहे. मध्य प्रदेशमधील पोलिसांनी एका डिलिव्हरी बॉयला बाईक भेट देऊन सर्वांची मने जिंकली आहेत. अशीच एक घटना राजस्थानात घडल्याची चांगली बातमी काही दिवसांपूर्वीच मुक्तपीठनं दिली होती.

डिलिव्हरी बॉयला पोलिसांकडून दुचाकी भेट

  • हे मध्य प्रदेशातील इंदूरमधे घडले आहे, जिथे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला बाईक देण्यासाठी पैसे जमा केले.
  • हा २२ वर्षांचा तरुण एका ऑनलाइन फूड अॅपसाठी सायकलवर जेवण पोहोचवतो. पण यंदाच्या उन्हाळ्यात ते इतके सोपे नाही.
  • पोलिसांना हा प्रकार समजला आणि त्यांनी त्या व्यक्तीसाठी दुचाकी खरेदी केली.
  • पोलिसांनी या मुलाला उन्हाळ्यात सायकलवरून जेवण देताना अनेकदा पाहिले होते, असे सांगण्यात आले.

मध्य प्रदेशच्या विजय नगर पोलिसांचे मोठे मन

  • इंदूरमधील विजय नगर पोलिस ठाण्याचे स्टेशन इनचार्ज तहजीब काझी यांनी जय हल्दे या तरूणाला गस्त घालत असताना घामाघूम सायकल चालवताना पाहिले.
  • त्याला शक्य तितक्या लवकर ग्राहकांपर्यंत ऑर्डर पोहोचवावी लागते.
  • त्याच्याशी बोलल्यावर कळाले की त्याचे कुटुंब आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडे दुचाकी घेण्यासाठी पैसे नाहीत.
  • यानंतर स्टेशन इनचार्ज यांनी तरुणाला मदत करण्याची योजना आखली आणि पोलीस ठाण्यातील काही साथीदारांच्या मदतीने तरुणाच्या दुचाकीचे डाऊन पेमेंट करण्यासाठी पुरेसे पैसे उभे केले.
  • बाईक मिळाल्यानंतर त्या तरुणाने पोलिसांच्या या औदार्याला सलाम केला आणि म्हणाला, ‘पूर्वी मी दिवसाला ६ ते ८ पार्सल पोहोचवू शकत होतो. पण आता मी १५ ते २० डिलिव्हरी पोहोचवू शकतो.
  • एवढेच नाही तर दुचाकीचे उर्वरित हप्ते आपण स्वतः देणार असल्याचे या प्रामाणिक माणसाने सांगितले.

काही दिवसांपूर्वी ३१ वर्षीय शिक्षक झालेल्या डिलिव्हरी बॉयची कहाणी इंटरनेटवर व्हायरल झाली होती, त्याची मेहनत आणि आवड पाहून २४ तासांच्या आत इंटरनेटच्या उदार जनतेने त्याला मोटरसायकल मिळवून दिली. या डिलिव्हरी बॉयचा फोटो आणि कथा ट्विटर यूजर आदित्य शर्माने ११ मार्च रोजी ट्विटरवर शेअर केली होती. त्यावर आधारीत बातमी मुक्तपीठनंही चांगली बातमी म्हणून दिली होती. त्यानंतर आता हे प्रकरण इंटरनेटवर चर्चेत आले आहे.

 

सोशल मीडियाची महाशक्ती! तरुणाच्या प्रयत्नांनी ‘शिक्षक’ डिलिव्हरी बॉयना नवी मोटर सायकल!


Tags: Bike giftDelivery BoyMadhya Pradesh PoliceMadhya Pradesh Vijay Nagar PoliceMotorcycle Visitचांगली बातमीडिलिव्हरी बॉयदुचाकी भेटमध्य प्रदेश पोलीसमध्य प्रदेश विजय नगर पोलीसमुक्तपीठमोटर सायकल भेट
Previous Post

मोदी सरकारचं दुसरं पर्व भलतंच महागडं, तीन वर्षात घरातील गॅस सिलिंडर २९० रुपयांनी महाग!

Next Post

मुंबई फर्स्टतर्फे हवामान बदलांवर आधारित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बैठकीचे आयोजन

Next Post
Mumbai First climate Action Plan 2

मुंबई फर्स्टतर्फे हवामान बदलांवर आधारित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बैठकीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!