Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तरप्रदेश निकाल: योगीच ठरले उपयोगी! भाजपा पुन्हा सत्तेत! सायकल पंक्चर!!

"योगींचं शासन, मोदींचं भाषण आणि कोरोना संकटातील राशन" या त्रिसुत्रीच्या विजयाचा दावा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Yogi And Modi

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच मतदारांनी उपयोगी मानलं आहे. तसंच ते भाजपाला देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्ता टिकवण्यासाठी उपयोगी ठरले आहेत. “योगींचं शासन, मोदींचं भाषण आणि कोरोना संकटातील राशन” या त्रिसुत्रीच्या बळावर भाजपाने उत्तरप्रदेशात अटीतटीच्या वाटणाऱ्या लढतीत चांगला विजय मिळवला आहे. पण आता पर्यंत राज्यातील ४०३ जागांवरील आघाडी स्पष्ट झाली आहे. भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलेल्या समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांची सायकल सत्तालक्ष्याआधीच पंक्चर झाली असली तरी त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने ११८ जागा मिळवल्या आहेत. त्यांनी सत्ता जरी मिळवली नसलं तरी २०१७च्या भाजपाच्या ३२५ जागांमध्ये वजाबाकी करत किमान ५०ने भाजपाच्या जागा कमी केल्या आहेत. तरीही प्रतिकुलता मानली जात असताना २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ता टिकवण्याची कामगिरी भाजपात योगींचं महत्व वाढवणारी ठरणार आहे.

 

भाजपा-सपा यांच्यात झाली मुख्य लढत

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला नेहमीप्रमाणे पोस्टल बॅलेटने सुरुवात झाली. पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीपासून आतापर्यंत यूपीच्या राजकीय लढाईची मुख्य लढत भाजपा आणि सपा यांच्यातच पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, बसपा आणि काँग्रेससह इतर पक्ष आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये खूपच मागे आहेत.

 

योगी आदित्यनाथांची गोरखपूरमध्ये प्रचंड आघाडी

  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून तीस हजारपेक्षाही जास्त मतांनी आघाडीवर आहेत
  • सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत
  • रायबरेलीत भाजपच्या उमेदवार अदिती सिंह पुढे आहेत
  • मतमोजणीच्या चार टप्प्यांनंतर रायबरेलीत भाजपच्या अदिती सिंह सपाच्या आरपी यादव यांच्यावर आघाडीवर आहेत.
  • कौशांबी येथील सिरथू विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य दोन फेऱ्यांनंतर पिछाडीवर होते, ते नंतर पुढे आले.

 

उत्तर प्रदेशचा कौल

एकूण जागा ४०३
आघाडी जाहीर ४०३ जागा

 

  • भाजपा २७४
  • समाजवादी पार्टी ११८
  • बसपा ४
  • काँग्रेस ४
  • इतर ३

उत्तर प्रदेशच्या मतदारांचा कौल कसा?

UP 2022 - ECI 12.11 - a

UP 2022 - ECI 12.11 -b


Tags: BJPVidhan sabha Electionyogi adityanathउत्तरप्रदेशनरेंद्र मोदीभाजपायोगी आदित्यनाथविधानसभा निवडणुकसपा
Previous Post

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधान परिषद

Next Post

“मराठा समाजाची दशा आणि दिशा” हे मराठा समाजातील विविध प्रश्नांचा वेध घेणारे पुस्तक

Next Post
dr ganesh golekar's book on maratha community

"मराठा समाजाची दशा आणि दिशा" हे मराठा समाजातील विविध प्रश्नांचा वेध घेणारे पुस्तक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!