मुक्तपीठ टीम
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, महिंद्रा आणि महिंद्रान एक मोठं पाऊल उचलत आहे. वाहन उद्योगातील हा नामांकित समूह एक नवीन ईव्ही कंपनी स्थापन करणार आहे. ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटसोबत नव्या कंपनीमध्ये दोन टप्प्यात १,९२५ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार आहे.
नवीन ईव्ही कंपनी ‘EV Co’ ने नियोजित उत्पादन पोर्टफोलिओसाठी २०२३-२४ ते २०२६-२७ या आर्थिक वर्षांमध्ये सुमारे ८,००० कोटी रुपये किंवा $१ बिलियनची एकूण भांडवली गुंतवणूकीचे नियोजन केले आहे.
महिंद्रा आणि महिंद्रा आणि ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट दोघेही या ईव्ही कंपनीमध्ये १,९२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. कंपनी चार चाकी इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करणार आहे. महिंद्रा आणि महिंद्रा आणि ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट यांनी या संदर्भात ‘बाइंडिंग’ करार केला आहे.
महिंद्रा आणि महिंद्राने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट १,९२५ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करेल. अशाप्रकारे, नवीन कंपनीमध्ये त्याची मालकी २.७५ टक्के ते ४.७६ टक्के असेल.
महिंद्रा आणि महिंद्रा आणि ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट निधीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कंपनीमध्ये इतर समविचारी गुंतवणूकदारांना संलग्न करण्यासाठी एकत्र काम करतील. महिंद्रा समूहाने २०४० पर्यंत पर्यावरण सकारात्मक बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.