Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आठ मंत्रालयांनी दलितांसाठी आतापर्यंत खर्च न केलेले ९५० कोटी आता सामाजिक न्याय मंत्रालयाला! निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे दलित कार्ड!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
unspend fund of 950cr of 8 ministry to social justice dept for dalits

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेशात पारंपरिक बसपाच्या मायावतींकडे असणाऱ्या दलित मतदारांना आपल्याकडे वळवण्यात यश आल्यानंतर आता भाजपाने देशभरात तोच प्रयोग करण्यावर लक्ष दिलं आहे. त्यासाठी आजवर मोदी सरकारमधील इतर अनेक महत्वाच्या मंत्रालयांनी अनुसुचित जातींवर खर्च न केल्याने बुडत चाललेला ९५० कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय खात्याकडे वळवण्यात आला आहे.

या दीड वर्षात देशातील ७ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, आणि गुजरात या राज्यांमध्ये लोकसंख्येत आणि निवडणुकींच्या निकालांवर प्रभाव पाडू शकणाऱ्या दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपाने रणनीती ठरवली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सामाजिक न्याय मंत्रालयाला ९५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी ८ मंत्रालयांच्या निधीतून तिथं वळवण्यात आला आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि उत्पन्नवाढीच्या योजनांसाठी हा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकार अनुसूचित जाती समाजातील लोकांकडे खास लक्ष देत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दलितांसाठीचा हा निधी कुठचा?

  • विकास कृती आराखड्याअंतर्गत आणि अनुसूचित जातींसाठी, ४१ मंत्रालयांनी त्यांच्या एकूण बजेटच्या २ ते २० टक्के रक्कम अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी खर्च करणे आवश्यक आहे.
  • परंतु बहुतांश मंत्रालयांना तसे केले नाही आणि अनेक मंत्रालयांनी इतर योजनांवर निधी खर्च केला.
  • दलित समाजासाठी असलेले हे इतर मंत्रालयांनी खर्च न केलेले ८ मंत्रालयांचे उर्वरित ९५० कोटी रुपये सामाजिक न्याय मंत्रालयाला दिले आहेत.
  • जेणेकरून ते अनुसूचित जाती प्रवर्गाशी संबंधित योजनांवर खर्च करता येतील.
  • केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय ७ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा मानला जात आहे.

कोणत्या मंत्रालयांनी दलितांसाठीचा निधी खर्च केला नव्हता?

  • सरकारने ज्या मंत्रालयांचा निधी हस्तांतरित केला आहे त्यात
  • पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
  • वाणिज्य आणि रस्ते वाहतूक
  • खाणकाम आणि कोळसा,
  • अन्न आणि रसद पुरवठा,
  • अन्न प्रक्रिया आणि दूरसंचार मंत्रालयांचा समावेश आहे.
  • अर्थ मंत्रालयाने उर्वरित ९५० कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या निर्णयाला २७ जुलै रोजीच खर्च विभागाने मान्यता दिली आहे.
  • मंत्रालयाची शिल्लक रक्कम सामाजिक आणि न्याय मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्याची अर्थ मंत्रालयाची ही पहिलीच वेळ आहे.

कोणत्या ४ योजनांवर रक्कम खर्च करणार?

  • केंद्र सरकारने सामाजिक न्याय मंत्रालयाला ९५० कोटी रुपयांचा दिलेला निधी ४ योजनांवर खर्च करण्याचे आदेश दिले आहेत.
  • डॉ.आंबेडकर उत्सव धाम योजना: त्याअंतर्गत गावोगावी कम्युनिटी हॉल बांधले जाणार आहेत.
  • पीएम अमृत जलधारा: याअंतर्गत दलित समाजातील लोकांच्या जमिनींवर सिंचन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
  • याशिवाय आणखी दोन योजना आहेत ज्यात ही रक्कम खर्च करायची आहे.

Tags: central govtpm modiSocial Justice And Empowermentसामाजिक न्याय मंत्रालयाल
Previous Post

महाराष्ट्रात ‘आप’मध्ये इनकमिंग! ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांसह धनराज वंजारींचा केजरीवालांच्या उपस्थितीत आपमध्ये प्रवेश!

Next Post

मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी ठाण्यात काँग्रेसचं आंदोलन का? समजून घ्या कारणं…

Next Post
Congress Agitation

मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी ठाण्यात काँग्रेसचं आंदोलन का? समजून घ्या कारणं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!