मुक्तपीठ टीम
अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूवर मात करणारे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानानुसार शरीरात एक मायक्रो चिप इंप्लांट केली जाईल. ही मायक्रो चिप कोरोनाचे विषाणू शोधेल आणि त्यांना शरीरातून बाहेरही काढेल. म्हणजेच शरीराला कोरोनामुक्त बनवेल.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनमधील शास्त्रज्ञांनी हे मायक्रो चिप तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा वापरही त्यांनी समजवून सांगितला आहे. ही चिप आपल्या शरीरात कोरोना विषाणूंचा संसर्ग खूप सहजपणे शोधून काढेल. त्यानंतर शोधलेले विषाणू एका फिल्टरद्वारे रक्तप्रवाहातून काढून टाकले जातील. हे नवीन तंत्रज्ञान डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने (डीआरपीए) विकसित केले आहे.
या टीमचे मुख्य महामारी तज्ज्ञ निवृत्त कर्नल डॉ. मॅट हॅपबर्न यांनी दावा केला आहे की, या तंत्रज्ञानामुळे कोरोना ही शेवटची महामारी ठरेल. भविष्यात कोणत्याही प्रकारचे जैविक आणि रासायनिक हल्ला रोखण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे तयार आहोत.
ही मायक्रो चिप शरीराच्या कोणत्याही भागामध्ये त्वचेखाली लावता येऊ शकते. ती शरीरात होणार्या प्रत्येक प्रकारची रासायनिक प्रतिक्रिया टिपते आणि ती आपल्याला संकेत पाठवते की आपल्याला किती वेळात संसर्ग होणार आहे. टिश्यू सारखी जेल मायक्रो चिपमध्ये असेल, ती सतत रक्ताची तपासणी करेल आणि अहवाल देत राहील.
तुम्ही जिथे असाल तिथे तुमचे रक्त तपासू शकता. त्याचा रिपोर्ट ३ ते ५ मिनिटात उपलब्ध होईल. चाचण्या आणि परिणाम त्वरित प्राप्त होत असल्याने, वेळ न गमावता, संसर्ग पसरण्याआधी विषाणू नष्ट केला जाऊ शकतो. यासाठी, पेंटॅगॉनच्या सहकारी पॅथॉलॉजी संस्थेच्या सहकार्याने रक्ताच्या तपासणीसाठी डायलिसिससारखं यंत्र विकसित केले आहे. ते रक्तप्रवाहापासून विषाणू पूर्णपणे काढून टाकते. डॉ. हॅपबर्न म्हणाले की, आम्ही त्याचा उपयोग सैन्य दलाच्या एका रुग्णावर केला. या यंत्राद्वारे त्याच्या रक्तातील विषाणू पूर्णपणे काढून टाकला गेला. आता तो स्वस्थ आहे. अमेरिकन फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) आपत्कालीन वापरासाठी या तंत्रज्ञानाला मंजुरी दिली आहे.
पाहा व्हिडीओ: