Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटापासून दूर हिमाचलमध्ये वर्क फ्रॉम होम!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
himachal paradesh

मुक्तपीठ टीम

देशातील बर्‍याच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पण अशीही काही राज्ये आहेत, जेथे कोरोनाचा संसर्ग तेवढासा नाही. अशांपैकीच एक राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश.अशा परिस्थितीत गुजरात, मुंबई, ओडिसा येथील पर्यटक हिमाचलकडे वळले आहेत. तेथे कोरोनापासून सुरक्षित वातावरणात सुंदर निसर्गाच्या सहवासात ते राहत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या आनंदासोबत वर्क फ्रॉमची जबाबदारीही ते पार पाडू शकत आहेत. अनेक पर्यटकांनी कुल्लू जिल्ह्यात होम स्टे तीन-तीन महिन्यांपर्यंत बुक केलेले आहेत.

 

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी होम स्टे ऑपरेटर आकर्षक ऑफर देत आहेत. काही होम स्टे ऑपरेटर ५० टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत, तर काहीजण लांब बुकिंग करणार्‍यांना न्याहारी मोफत देत आहेत. स्वच्छ आणि शांत वातावरणात पर्वतांच्या सुंदर जागेत फिरण्याबरोबरच गर्द वनराई किंवा खोलीत बसून पर्यटक आपले कार्यालयीन कामकाजही करत आहेत.

 

सनशाईन कॉटेज आणि ग्रेट हिमालयन कॅफेमध्ये अनेक पर्यटक १५-१५ दिवस मुक्काम करत आहेत. होम स्टे मालकांच्या म्हणण्यानुसार दक्षिण भारतातील पर्यटक जास्त दिवस मुक्क करण्यासाठी संपर्क करत आहेत. पर्यटक दीर्घकाळ मणिकर्ण आणि मनालीऐवजी तीर्थन खोऱ्यात राहणे पसंत करत आहेत. कोरोना काळात हे पर्यटक इथल्या पर्यटन व्यवसायाला आधार ठरत आहेत.

 

पर्यटकांना कोरोना काळात, डोंगराळ प्रदेश, विशेषत: तीर्थ खोरे, सर्वात सुरक्षित वाटते. सॅनिटाइझ रूममध्ये बसून अधिक चांगल्या दूरसंचार प्रणालीसह कार्यालयीन कामे करणे भावत आहे. सकाळ आणि संध्याकाळी पर्यटन स्थळांचा प्रवास, ट्रेकिंग आणि सोबत कामही करायचे. त्याचबरोबर स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा असा दिनक्रम कोणाला भावणार नाही!

 

पाहा व्हिडीओ:


Tags: mumbaiओडिसाकोरोना संकटगुजरातमुंबईवर्क फ्रॉम होमहिमाचल
Previous Post

टाटा मोटर्सची मनाला भिडणारी जाहिरात…आपुलकीचा संदेश

Next Post

मायक्रो चिप शोधणार आणि बराही करणार कोरोना!

Next Post
corona

मायक्रो चिप शोधणार आणि बराही करणार कोरोना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!