केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये ५६ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २८ जानेवारी २०२१ रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत अर्ज करू शकतात. पात्रता आणि इतर माहितीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वरून माहिती मिळवू शकता.
शैक्षणिक पात्रता
पद क्र. १ : (१) पदवीधर (२) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. २ ते ८ : (१) एमबीबीएस (२) संबंधित विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी (३) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ९ : (१) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी (२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट
२८ जानेवारी २०२१ रोजी,
[एससी/एसटी: ०५ वर्षे सूट, ओबीसी: ०३ वर्षे सूट]
पद क्र. १ : ३५ वर्षांपर्यंत
पद क्र. २ ते ८ : ४५ वर्षांपर्यंत
पद क्र. ९ : ४० वर्षांपर्यंत
शुल्क
सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस: २५ रुपये / – [एससी / एसटी / पीएच / महिलांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही]